श्रीलंकेत स्वातंत्र्यदिनी तमीळ राष्ट्रगीत नाही

पीटीआय
मंगळवार, 4 फेब्रुवारी 2020

श्रीलंकेच्या ७२व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित होणाऱ्या कार्यक्रमात यंदा प्रथमच तमीळ राष्ट्रगीत होणार नसल्याचे सांगण्यात आले. श्रीलंकेचे राष्ट्रगीत केवळ सिंहली भाषेत होईल, असे गृहमंत्रालयाच्या अधिकाऱ्याने सांगितले. श्रीलंकेतील बहुसंख्य सिंहली समुदायाला प्राधान्य देण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.

कोलंबो - श्रीलंकेच्या ७२व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित होणाऱ्या कार्यक्रमात यंदा प्रथमच तमीळ राष्ट्रगीत होणार नसल्याचे सांगण्यात आले. श्रीलंकेचे राष्ट्रगीत केवळ सिंहली भाषेत होईल, असे गृहमंत्रालयाच्या अधिकाऱ्याने सांगितले. श्रीलंकेतील बहुसंख्य सिंहली समुदायाला प्राधान्य देण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.

कोरोनाचा धुमाकूळ सुरूच; मृतांचा आकडा 361 वर; केरळमध्ये तिसरा रूग्ण

२०१५ रोजी श्रीलंकेच्या तत्कालीन सरकारने तमीळ अल्पसंख्याक समुदायाशी सौहार्दाचे संबंध प्रस्थापित करण्यासाठी स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात तमीळ राष्ट्रगीताचा समावेश केला होता. श्रीलंकेचे अध्यक्ष गोतबाया राजपक्षे यांनी दोन महिन्यांपूर्वी शपथ घेताना बौद्ध धर्मास प्राधान्य देण्याचा विचार मांडला होता. श्रीलंकेत २.१ कोटी लोकसंख्या ही बौद्ध धर्म मानणारे सिंहली बहुसंख्याक आहेत. देशात १२ टक्के हिंदू असून, ते मूळचे तमीळ आहेत. श्रीलंकेच्या घटनेत सिंहली आणि तमीळ राष्ट्रगीत म्हणण्यास परवानगी दिली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: There is no Tamil national anthem on Independence Day in Srilanka