इंग्लंडमध्ये मुदतपूर्व निवडणुकीचे थेरेसा मेकडून सूतोवाच

वृत्तसंस्था
बुधवार, 19 एप्रिल 2017

लंडन : युरोपीय संघाबाहेर पडण्याची शक्‍यता पाहून ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे या येत्या 8 जूनला मध्यावधी निवडणुकीची घोषणा करण्याची शक्‍यता आहे. इंग्लंडमध्ये राजकीय स्थिरता आणण्यासाठी हाच एकमेव उपाय असल्याचे मे यांनी स्पष्ट केले आहे. डाउनिंग स्ट्रीट कार्यालयाबाहेर बोलताना त्या म्हणाल्या, की कॅबिनेटच्या बैठकीत मुदतपूर्व निवडणूक प्रस्तावावर सर्वांचे एकमत झाले असून, त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. विद्यमान सरकारचा कालावधी 2020 पर्यंत आहे.

थेरेसा मे यांनी ब्रेक्‍झिट पत्रावर औपचारिकता पार पाडण्यासाठी हस्ताक्षर करण्याबरोबरच युरोपीय संघाबाहेर पडण्याची प्रक्रिया सुरू झाली. ब्रिटनने नऊ महिन्यांपूर्वी युरोपीय संघाबाहेर जाण्यासाठी घेतलेल्या मतचाचणीत नागरिकांनी संघापासून वेगळे होण्याचा कौल दिला. ब्रिटन 1973 पासून युरोपीय संघाशी जोडलेला आहे. जनमतचाचणी झाल्यानंतर झालेल्या राजकीय उलथापालथीनंतर थेरेसा मे ब्रिटनच्या पंतप्रधान झाल्या आणि त्यांच्याकडे हा निर्णय लागू करण्यासाठी मार्च 2019 पर्यंतच वेळ आहे. दरम्यान, ब्रिटनच्या कायद्यानुसार सार्वत्रिक निवडणुका दर पाच वर्षाला मे महिन्यात होतात आणि पुढील निवडणूक 2020 रोजी होणार होती; मात्र कनिष्ट सभागृहात दोन तृतियांश खासदारांनी मुदतपूर्व निवडणुकीला कौल दिला, तर निवडणुका अगोदरच घेतल्या जातील.

Web Title: theresa may and england election