esakal | इम्रान खानच्या या चार सल्लागाराकडे दुहेरी नागरिकत्व
sakal

बोलून बातमी शोधा

Imran-Khan

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या चार विशेष सल्लागारांकडे दुहेरी नागरिकत्व असल्याने त्यांना काढून टाकण्याची मागणी विरोधकांनी केली.

सरकारनेच त्यांची संपत्ती व नागरिकत्वाची माहिती संकेतस्थळावर टाकत पारदर्शक भूमिकेनुसार काहीही लपविण्याचा प्रयत्न केला नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. या माहितीनुसार इम्रान यांना 20 सल्लागार आहेत. त्यातील 19 जण निवडून आलेले नाहीत. 

इम्रान खानच्या या चार सल्लागाराकडे दुहेरी नागरिकत्व

sakal_logo
By
यूएनआय

इस्लामाबाद - पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या चार विशेष सल्लागारांकडे दुहेरी नागरिकत्व असल्याने त्यांना काढून टाकण्याची मागणी विरोधकांनी केली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सरकारनेच त्यांची संपत्ती व नागरिकत्वाची माहिती संकेतस्थळावर टाकत पारदर्शक भूमिकेनुसार काहीही लपविण्याचा प्रयत्न केला नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. या माहितीनुसार इम्रान यांना 20 सल्लागार आहेत. त्यातील 19 जण निवडून आलेले नाहीत. 

कृष्णविवराचे प्रभामंडळ टिपण्यात शास्त्रज्ञांना यश; आजवरची अद्भूत घटना!

यातील ऊर्जा क्षेत्र सल्लागार शहझाद कासीम व पेट्रोलियम सल्लागार नदीम बाबर यांच्याकडे अमेरिकेचे, परराष्ट्र व्यवहार सल्लागार सय्यद झुल्फीकार अब्बास बुखारी यांच्याकडे ब्रिटनचे, तर डिजीटल सल्लागार तानिया एस. अर्डौस यांच्याकडे कॅनडाचे नागरिकत्व आहे. याशिवाय राजकीय सल्लागार शाहबाझ गील यांच्याकडे अमेरिकेत तात्पुरत्या निवासाचा परवाना आहे.

तेव्हा इम्रानच विरोधात
इम्रान विरोधी पक्षात असताना दुहेरी नागरिकत्वास तीव्र विरोध करायचे. हाच संदर्भ देत विरोधी पक्षांनी अशा सल्लागारांना हटविण्याची मागणी केली आहे.

Edited By - Prashant Patil