Railway Stations : परदेशात जाण्यासाठी फक्त विमानच नाही, तर रेल्वेनेही जाऊ शकता; ९० टक्के लोकांना हे माहित नसेल!

काहींना अटारीबद्दल माहित आहे, पण त्याहूनही वेगळी स्टेशन्स आहेत.
Central Railway Megablock
Central Railway Megablockesakal

तुम्हाला माहित आहे का की देशात अशी ७ रेल्वे स्टेशन आहेत जिथून ट्रेन थेट परदेशात जातात. काही लोकांना अटारीबद्दल माहिती असण्याची शक्यता आहे, पण हा लेख वाचणाऱ्या ९० टक्क्यांहून अधिक लोकांना बाकीच्या ६ स्टेशन्सबद्दल माहिती नसेल.कोणती आहेत ही स्टेशन्स? जाणून घ्या.

हल्दीबारी

हे पश्चिम बंगालमधल्या न्यू जलपाई गुडी रेल्वे स्थानकापासून वेगळं स्थानक आहे. हे बांगलादेशपासून फक्त ४.५ किलोमीटर अंतरावर आहे. इथून तुम्ही बांगलादेशला सहज जाऊ शकता.

जय नगर

हे स्टेशन मधुबनी, बिहारमध्ये आहे. इथून गाड्या नेपाळला जातात. आंतर भारत-नेपाळ ट्रेन इथून धावते. या ट्रेनने तुम्ही आरामात नेपाळला जाऊ शकता. या परिसरातले लोक नेपाळला जाण्यासाठी या ट्रेनची मदत घेतात.

Central Railway Megablock
Vat Purnima 2023 : उपवासाला चालणारा; घराघरात आवडणारा साबुदाणा परदेशातून भारतात कसा आला?

पेट्रापोल

पेट्रापोल स्टेशनवरूनही तुम्ही बांगलादेशला जाऊ शकता. हे स्टेशन प्रामुख्याने दोन देशांमधील आयात-निर्यातीसाठी वापरलं जातं.

सिंगाबाद

हे स्टेशन पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यात आहे. इथून बांगलादेशला जाण्यासाठी गाड्या उपलब्ध आहेत. ही ट्रेन रोहनपूरमार्गे बांगलादेशला जाते.

जोगबनी

हा बिहारमधला जिल्हा आहे. हे स्टेशन नेपाळपासून इतकं जवळ आहे की तिथं जाण्यासाठी तुम्हाला ट्रेन पकडण्याचीही गरज नाही. भारतातून नेपाळला पायी जाता येतं.

राधिकापूर

हे स्टेशन मालवाहतुकीसाठी वापरलं जातं. हे झिरो पॉइंट रेल्वे स्टेशन म्हणूनही ओळखलं जातं. हे स्टेशन पश्चिम बंगालमध्येही आहे, इथून ट्रेन बांगलादेशला निघते.

अटारी स्टेशन

हे सर्वात प्रसिद्ध स्टेशन पंजाबमध्ये आहे. हे उत्तर रेल्वेचं शेवटचं स्थानक आहे. इथून समझौता एक्सप्रेस पाकिस्तानला जायची. मात्र आता ही ट्रेन सुरक्षेच्या कारणास्तव बंद करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com