ट्रम्प यांच्या सभांमध्ये नियम पायदळी; मास्कविना हजारोंच्या संख्येने समर्थकांची उपस्थिती

पीटीआय
Wednesday, 16 September 2020

रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार असलेले डोनाल्ड ट्रम्प हे अटीतटीच्या लढतीची शक्यता असलेल्या राज्यांमध्ये सभा घेत आहेत.सभांना त्यांचे समर्थक मास्क घालणे, सोशल डिस्टन्सिंग असे कोणतेही नियम पाळताना दिसत नाहीत.

वॉशिंग्टन - कोरोना संसर्गाच्या काळात अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कायदा आणि सुव्यवस्था पालन करण्याची प्रमुख जबाबदारी असताना त्यांच्याच प्रचार सभांमध्ये आरोग्य सुरक्षेचे सर्व नियम पायदळी तुडवले जात असल्याचे निदर्शनास येत आहे.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार असलेले डोनाल्ड ट्रम्प हे अटीतटीच्या लढतीची शक्यता असलेल्या राज्यांमध्ये सभा घेत आहेत.  या सभांना गर्दी होत असून त्यांचे समर्थक मास्क घालणे, सोशल डिस्टन्सिंग असे कोणतेही नियम पाळताना दिसत नाहीत. अनेक राज्यांच्या राज्यपालांनी ट्रम्प यांना सभा टाळण्याचे आणि नागरिकांचा जीव धोक्यात न घालण्याचे आवाहन केले आहे. परंतु ट्रम्प यांचे प्रचारप्रमुखांनी सभांचे समर्थन केले. ‘हजारो नागरिक रस्त्यावर येऊन आंदोलन करु शकतात, कॅसिनो खेळू शकतात, हिंसाचारात दुकानांची तोडफोड करु शकतात तर ट्रम्प यांचे भाषण ऐकण्यासाठीही लोक एकत्र येऊ शकतात,’ असे त्यांचे म्हणणे आहे. ट्रम्प यांच्या नेवादा येथे झालेल्या सभेतही हेच चित्र पहायला मिळाले. डेमोक्रॅटिक पक्षाने या सभेवर टीका केली आहे. नेवादाचे राज्यपाल स्टीव्ह सिसॉलिक यांनी ट्विट करताना म्हटले की, ट्रम्प हे आपल्या स्वार्थासाठी असंख्य लोकांचा जीव धोक्यात घालत आहेत. अशा प्रकारची जोखीम ही कोरोनाला लढण्यासाठी टाकण्यात येणाऱ्या पावलांना मागे नेणारी आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

विरोधक कचाट्यात 
डोनाल्ड ट्रम्प यांच्या सभांना मोठी गर्दी होत असली तरी विरोधकांची सत्ता असलेल्या राज्यांमध्येही या सभा रोखण्यास ते पुढे येताना दिसत नाहीत. या सभांना विरोध केल्यास अमेरिकी नागरिकांच्या स्वातंत्र्यावर गदा आणली जात असल्याचा आरोप ट्रम्प करू शकतात आणि त्याचा निवडणुकीत फटका बसू शकतो, अशी भीती विरोधकांना वाटत आहे. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thousands of supporters attend Donald Trump rallies without masks