धक्कादायक ! ऑस्ट्रेलियात वणव्यांमध्ये तीन अब्ज प्राण्यांचा बळी; 'या' संस्थेचा निष्कर्ष

पीटीआय
शुक्रवार, 31 जुलै 2020

ऑस्ट्रेलियात दरवर्षी जंगलात लागणाऱ्या वणव्यांमध्ये वन्यजीवसृष्टीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. मात्र, या वणव्यांचे प्रमाण आता वाढले असून २०१९ आणि २०२० या वर्षांमध्ये लागलेल्या विनाशकारी  वणव्यांमध्ये तीन अब्जांहून अधिक प्राणी-पक्ष्यांचा बळी गेला आहे, अथवा त्यांचा अधिवास नष्ट होऊन त्यांना दुसरीकडे आश्रय घ्यावा लागला आहे.

मेलबर्न - ऑस्ट्रेलियात दरवर्षी जंगलात लागणाऱ्या वणव्यांमध्ये वन्यजीवसृष्टीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. मात्र, या वणव्यांचे प्रमाण आता वाढले असून २०१९ आणि २०२० या वर्षांमध्ये लागलेल्या विनाशकारी  वणव्यांमध्ये तीन अब्जांहून अधिक प्राणी-पक्ष्यांचा बळी गेला आहे, अथवा त्यांचा अधिवास नष्ट होऊन त्यांना दुसरीकडे आश्रय घ्यावा लागला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

वर्ल्ड वाइड फंड फॉर नेचर (डब्लूडब्लूएफ) या संस्थेने केलेल्या अभ्यासात हा निष्कर्ष निघाला आहे. ऑस्ट्रेलियातील वणव्यांचा वन्यजीवनावर होणाऱ्या परिणामाचा प्रथमच शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास केला गेला आहे. या वणव्यांमध्ये १.२ अब्ज प्राणी-पक्षी मारले अथवा विस्थापित झाल्याचा निष्कर्ष जानेवारीत काढण्यात आला होता. मात्र, नंतर केलेल्या अभ्यासात ही संख्या जवळपास तिप्पट असल्याचे आढळून आले आहे. सिडने विद्यापीठाच्या नेतृत्वाखाली दहा संशोधकांच्या गटाने हा अभ्यास केला आहे. याबाबतचा अंतिम अहवाल अद्याप तयार व्हायचा असला तरी प्राणी-पक्ष्यांच्या नुकसानीच्या आकडेवारीत बदल होणार नाही, असे संशोधकांनी सांगितले आहे. ऑस्ट्रेलियातील जंगलक्षेत्रापैकी तब्बल ११४.६ कोटी हेक्टर जागेवर आगीने तांडव केले होते.

अमेरिकेतील मृतांची संख्या दीड लाखांहून अधिक 

अभ्यासातील प्राथमिक निष्कर्ष

  • या वणव्यांमुळे स्थानिक जैववैविध्यात बदल
  • शेतासाठी वणवे लावणे थांबविणे आवश्‍यक
  • वन जमीन मोकळी करण्याचे प्रमाण सध्या प्रचंड
  • पर्यावरण बदलाचाही आगींवर परिणाम

गेल्या काही शतकांतील वन्य प्राणीजीवनाची इतक्या मोठ्या प्रमाणावर हानी कधीही झाली नव्हती. असा प्रकार जगात कोठेही घडला नव्हता. हे नुकसान अत्यंत धक्कादायक आणि दु:खद आहे. 
- डर्मोट ओगॉरर्मन, सीईओ, डब्लूडब्लूएफ-ऑस्ट्रेलिया

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three billion animals killed in the australia fire