esakal | ‘तेहरीके’च्या हल्ल्यात पाकमध्ये तीन बळी
sakal

बोलून बातमी शोधा

तेहरीके

‘तेहरीके’च्या हल्ल्यात पाकमध्ये तीन बळी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कराची (पीटीआय) : बलुचिस्तान प्रांतात क्वेट्टा येथे आज तेहरीके तालिबान पाकिस्तान (टीटीपी) या संघटनेच्या दहशतवाद्याने केलेल्या आत्मघाती हल्ल्यात तीन सैनिकांचा मृत्यू झाला, तर वीस जण जखमी झाले. दहशतवाद्यांनी येथील एका तपास नाक्याला लक्ष्य करत हा हल्ला केला होता.

हेही वाचा: 'त्या' घटनेनंतर ५ लाख शिखांनी अफगाणिस्तान सोडले होते...

बलुचिस्तानमध्ये दहशतवाद्यांचा सामना करण्यासाठी एका विशेष दलाची स्थापना करण्यात आली आहे. याच दलाचे सैनिक सोना खान तपास नाक्यावर तैनात असतात. देशातील अल्पसंख्य हजारा समुदायाच्या भाजी विक्रेत्यांना संरक्षण पुरविणारी गाडी तपास नाक्यावर असताना दहशतवाद्यांनी गाडीला लक्ष्य केले. दहशतवाद्याने गाडीजवळ जात स्फोट घडवून आणला. या मोठ्या स्फोटात तीन सैनिक जागीच मृत्युमुखी पडले, तर १८ सैनिक आणि दोन नागरिक जखमी झाले.

हेही वाचा: अफगाणिस्तानपुढे धर्मांधतेचे आव्हान

या हल्ल्याद्वारे ‘टीटीपी’ पाकिस्तान सरकारला इशारा दिल्याचे मानले जात आहे. या संघटनेचे दहशतवादी अफगाणिस्तानमध्ये लपून बसले असून अफगाणिस्तानची सूत्रे हाती घेतलेल्या तालिबानच्या मदतीने त्यांना पकडता येईल, अशी पाकिस्तानला आशा आहे. मात्र, अफगाणिस्तानमधील सरकारबदलाचा कोणताही परिणाम होणार नसल्याचा इशारा ‘टीटीपी’ने दिला असल्याचे विश्‍लेषकांचे म्हणणे आहे.

loading image
go to top