esakal | अफगाणिस्तानपुढे धर्मांधतेचे आव्हान
sakal

बोलून बातमी शोधा

Taliban-Afghanistan

अफगाणिस्तानपुढे धर्मांधतेचे आव्हान

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

काबूल : अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता आल्याने जगभरात चिंता व्यक्त होत आहे. धर्मांध तालिबान्यांच्या राजवटीत अफगाणी नागरिकांचे मानवी हक्क किती सुरक्षित राहतील, यावर चर्चा सुरू झाली आहे. तेथील मुलांचे शिक्षण आणि संस्कृतीला धोका निर्माण होण्याची भीती संयुक्त राष्ट्रांच्या (यूएन) शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटनेला (युनेस्को) वाटत आहे. गेल्या काही दशकांत जे मिळविले, ते लक्षात घेता भविष्यात अफगाणिस्तानमध्ये काय आव्हाने असतील, याकडे आंतरराष्ट्रीय समूहाचे लक्ष वेधले आहे.

सांस्कृतिक वारसा

 • अफगाणिस्तानचा इतिहास आणि ओळख निर्माण करणारी अनेक सांस्कृतिक स्थळे येथे आहेत

 • हेरतमधील जुन्या शहराचा परिसर, बामियान खोरे आणि काबूलच्या राष्ट्रीय संग्रहालयाचा समावेश

 • देशातील हा पुरातन वारसा जपण्यासाठी व पुनरुज्जीवनासाठी अनेक योजनांची अंमलबजावणी. उदा. बामियान सांस्कृतिक केंद्राची स्थापना

 • छायाचित्रण स्पर्धेचे आयोजन

हेही वाचा: ISI चे चीफ फैझ हमीद काबुलमध्ये दाखल, पडद्यामागे काय घडणार?

माध्यमांचा विकास

२००२ ते २०२० या काळात अफगाणिस्तानमध्ये अनेक नव्‍या माध्यम संस्थांची स्थापना झाली.

ऐतिहासिक वळणावर अफगाणिस्तान

तालिबानी राजवटीसंदर्भात ‘युनेस्को’ने म्हटले आहे की, अफगाणिस्तान इतिहासाच्या नव्या वळणावर आहे. गेल्या काही दशकांत या देशाने मानवाधिकारांचे पालन, शिक्षण आणि आंतरराष्ट्रीय मानकांनुसार जी प्रगती केली आहे, ती कायम राहणे हे देशासाठी व संपूर्ण क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. ‘युनेस्को’ने अफगाणिस्तान आणि आंतरराष्ट्रीय भागीदारांच्या साथीत २००२ नंतर तेथे परिवर्तन घडवून आणले आहे. उदा. शिक्षण व्यवस्थेत सुधारणा, सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणे, विज्ञानविषयक क्षमता वाढविणे व पत्रकारांना संरक्षण देण्यासाठी अनेक देशव्यापी कार्यक्रम राबविण्यात आले आहेत. तालिबानच्या सत्ताकाळात अफगाणिस्तानमधील सांस्कृतिक वारशाला कोणत्याही प्रकारे धक्का पोचल्यास तेथील स्थायी शांतता आणि मदत कार्यावर विपरीत परिणाम होण्याचा इशारा ‘युनेस्को’ने दिला आहे. गेल्या २० वर्षांत देशाचा चेहरामोहरा बदलला आहे. येथील समाजाने मोठी प्रगती केली आहे. पण त्याचे रक्षण न केल्यास विकसित अफगाणिस्तान पुन्हा जुन्‍या वळणावर जाईल, असे या संघटनेने म्हटले आहे.

हेही वाचा: अफगाणिस्तानात तालिबानचं आज नवं सरकार; मुल्ला बरादर असणार 'प्रमुख'

‘युनेस्को’मुळे शैक्षणिक बदल

साक्षरतेच्या दरात मोठी वाढ

 • अफगाणिस्तानमध्ये २००२मध्ये ३४ टक्के साक्षरता होती. २०२० मध्ये हे प्रमाण ४३ टक्क्यांवर पोचले

 • स्वीडन, जपान, नॉर्वे, डेन्मार्क, ‘यूएन’च्या संघटना आणि अफगाणिस्तानमधील सामाजिक संस्थांच्या मदतीने तेथे सर्वांत मोठी साक्षरता मोहीम राबविली

 • साक्षरता मोहिमेत एक कोटीपेक्षा जास्त लोकांना शिक्षण दिले. यात आठ लाख महिला व मुलींचा समावेश होता

 • देशातील ४५ हजार पोलिसांनाही शिक्षण मिळाले

 • राष्ट्रव्यापी शिक्षण सुधारणा विकास कार्यक्रमात २००२नंतर सरकारला सहकार्य

 • या कार्यक्रमात राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा समावेश. राष्ट्रीय शिक्षण संस्था सुरू करण्यावर प्रथमच विचार

 • सामान्य शिक्षण पाठ्यक्रमात सुधारणा, उच्च शिक्षणासाठी विशेष योजना निश्‍चित केली होती

 • शिक्षण क्षेत्रातील विकास व योजनांच्या समन्वयासाठी सर्व ३४ प्रांतातील ७४१ योजना अधिकाऱ्यांना प्रशिक्षण

 • २०१८ पासून ‘फिजिक्स विदाउट फ्रंटियर’ मोहिमेचे आयोजन. भौतिकशास्त्राच्या अभ्यासक्रमात सुधारणांसाठी शिक्षकांना मदत

 • भौतिकशास्त्र अभ्यासक्रमासाठी सुमारे ४०० अफगाणी विद्यार्थ्यांनी काबूल विद्यापीठात प्रवेश घेतला होता

हेही वाचा: काबुलमध्ये तालिबानकडून महिलेला मारहाण, मोर्चाला हिंसक वळण

२०२० मधील स्थिती

१,८७९

माध्यम संस्था

२०३

दूरचित्रवाणी वाहिन्या

३४९

रेडिओ वाहिन्या

१, ३२७

वृत्तपत्र संस्था

१,१३९

महिला पत्रकार

loading image
go to top