तिबेटला ६.९ रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का

वृत्तसंस्था
शनिवार, 18 नोव्हेंबर 2017

तिबेटच्या एकाच भागात 8 वाजून 31 मिनिटांच्या सुमारास 5 तीव्र भूकंप झाले. दुसऱ्या भूकंपाचे केंद्रस्थान सुमारे सहा किलोमीटर खोल इतके होते. या प्रकरणी अद्यापि अधिक माहितीची प्रतीक्षा आहे

बीजिंग : अरूणाचल प्रदेशाच्या सीमेजवळ असलेल्या तिबेटच्या न्यिंगची या भागात 6.9 रिश्टर स्केल इतक्या तिव्रतेचा भूकंप आज (शनिवार) पहाटेच्या सुमारास झाला.

चीनमधील भूकंपमापन संस्थेच्या माहितीनुसार 6 वाजून 34 मिनिटांनी (बीजिंग वेळेनुसार) न्यिंगचीला भूकंपाचा धक्का बसला. भूकंपाचे केंद्रस्थान सुमारे दहा किलोमीटर खोल इतके होते, अशी माहिती येथील सरकारी वृत्तसंस्थेने दिली.     

तिबेटच्या एकाच भागात 8 वाजून 31 मिनिटांच्या सुमारास 5 तीव्र भूकंप झाले. दुसऱ्या भूकंपाचे केंद्रस्थान सुमारे सहा किलोमीटर खोल इतके होते. या प्रकरणी अद्यापि अधिक माहितीची प्रतीक्षा आहे. 

Web Title: Tibet earthquake china