

Bhupender Yadav Highlights Climate Biodiversity Link at IBCA
Sakal
बेलेम (ब्राझील) : वाघ, बिबट्या, चित्त्यांच्या संरक्षणासाठी पावले उचलण्याचे आवाहन भारताने जागतिक नेत्यांना केले. या प्रजातींचे भविष्य सुरक्षित केल्यास मानवजातीसाठी सुरक्षित आणि दीर्घकालीन जीवन सुनिश्चित होईल, अशी भूमिकाही भारताने मांडली. येथे सुरू असलेल्या हवामान परिषदेत (सीओपी ३०) ‘इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स’ (आयबीसीए) उच्चस्तरीय मंत्रिगटाला पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव यांनी संबोधित केले. वाघ, बिबट्या आदींच्या संख्येतील घटीमुळे संपूर्ण पर्यावरणसंस्थाच अस्थिर होईल, असा इशाराही त्यांनी दिला.