esakal | आता 'या' देशातही टिकटॉकवर येणार बंदी!
sakal

बोलून बातमी शोधा

Tik Tok.

- भारताकडून 59 चीनी ऍप्सना बंदी घालण्यात आली.

- टिकटॉक, युसी ब्राउझरसह शेअर इट यांसारख्या ऍप्सवरही बंदी

आता 'या' देशातही टिकटॉकवर येणार बंदी!

sakal_logo
By
वृत्तसंस्था

व्हिक्टोरिया : भारत आणि चीन या दोन्ही देशांत झालेल्या संघर्षानंतर भारताकडून 59 चीनी ऍप्सना बंदी घालण्यात आली. तसेच गलवान खोऱ्यात चीनकडून होत असलेल्या घुसखोरीच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने कारवाई केली. त्याचाच एक भाग म्हणून भारतामध्ये प्रसिद्ध अशा टिकटॉक (TikTok) या ऍपवर बंदी घालण्यात आली. भारतानंतर आता हॉंगकाँगमध्येही ऍपवर बंदी येणार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  

अल्पावधीत प्रसिद्ध झालेल्या ऍप्समध्ये टिकटॉकचा समावेश येतो. हे ऍप चीनकडून तयार केले गेले आहे. त्यामुळे चीनला विरोध दर्शवत 59 ऍप्स भारतात बंद करण्यात आले. त्यामध्ये टिकटॉकवर बंदी घालण्यात आली. मात्र, आता भारतानंतर हाँगकाँगमध्येही टिकटॉकवर बंदी घालण्यात आली आहे. याबाबतचे वृत्त एएफपी न्यूज एजन्सीने दिले आहे. टिकटॉक, युसी ब्राउझरसह शेअर इट यांसारख्या ऍप्सवरही बंदी घालण्यात आली आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

15 जूनमध्ये सीमेवर झालेल्या वादात बिहार रेजिमेंटचे 20 जवान हुतात्मा झाले होते. आमच्याकडे उपलब्ध माहितीनुसार काही अॅप्समध्ये भारताची आणि नागरिकांचीही सुरक्षा धोक्यात येत आहे. भारत आणि चीनमध्ये संघर्ष झाल्यानंतर देशात चीनचा निषेध करण्यात आला.

चीनी मालावर बहिष्काराचे आवाहन

चीनी मालावर बहिष्काराचे आवाहन केले जात होते. चिनी मोबाईल अॅप धोकादायक असल्याची माहिती गुप्तचर विभागाने केंद्र सरकारला दिली होती. त्यानंतर भारत सरकारने मोठे पाऊल उचलत अॅपवर बंदीचा निर्णय घेतला आहे.

loading image