चीनी कंपन्यांची आर्थिक घडी विस्कटली; टिकटॉक अॅप विकणार?

टीम ई सकाळ
Sunday, 19 July 2020

चीनमधून उदयाला आलेल्या कोरोना विषाणूने संपूर्ण जगाला विळखा घातला. त्यानंतर या कोरोना विषाणूचाचा वाढता प्रादुर्भाव आणि चीनमधून होणाऱ्या कुरापतींमुळे अनेक देशांनी चिनी उत्पादित वस्तूंवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला. याचा मोठा फटका चिनी कंपन्यांना बसला असून त्या मोठ्या संकटात अडकल्या आहेत.

बिजिंग : चीनमधून उदयाला आलेल्या कोरोना विषाणूने संपूर्ण जगाला विळखा घातला. त्यानंतर या कोरोना विषाणूचाचा वाढता प्रादुर्भाव आणि चीनमधून होणाऱ्या कुरापतींमुळे अनेक देशांनी चिनी उत्पादित वस्तूंवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला. याचा मोठा फटका चिनी कंपन्यांना बसला असून त्या मोठ्या संकटात अडकल्या आहेत. एकंदर या सर्व गोष्टींचा परिणाम टिकटॉक या अॅपवर झाला असून जगातील वातावरण पाहता चिनी कंपनी बाईटडान्स या कंपनीने तिने बनवलेले आणि अल्पावधीत लोकप्रिय झालेले टिकटॉक हे अॅप विकण्याचा निर्णय घेण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे.

ताज्या बातम्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे अॅप

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

भारत आणि चीन मधील तणाव वाढल्यानंतर भारतात अनेक चिनी वस्तूंवर बहिष्कार देखील टाकला. केंद्र सरकारने  टिकटॉकसोबत सोबत अन्य ५९ चिनी अॅप्स भारतात बॅन केले. भारताने चीनविरूद्ध महत्त्वाचे पाऊल उचलल्यानंतर अमेरिका देखील यामुद्द्यावर विचार करत असल्याचं समोर येत आहे. एवढचं नाही तर पाकिस्तानात देखील टिकटॉक बॅन करण्याची मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर हे अॅप कंपनी विकण्याचा निर्णय घेऊ शकते असे बोलले जात आहे.
-----------
उत्तर भारताला पावसाचा जोरदार तडाखा; आसाममध्ये पूर
------------
राजस्थानच्या राजकारणात नवा ट्विस्ट; गृह खात्याने मागितले फोन टॅपिंग प्रकरणाचे रिपोर्ट
-------------

व्हाईट हाऊसने देखील यावर अंदाज वर्तवला आहे. चिनी कंपनी बाईटडान्स स्वतःला वाचवण्याकरता वादग्रस्त टिकटॉक अॅप विकण्याची शक्यता आहे. असं मत अमेरिकेचे आर्थिक सल्लागार लॅरी कुडलो यांनी वर्तवले आहे. 'आम्ही चिनी अ‍ॅपवर बंदी घालण्याचा अंतिम निर्णय घेतलेला नाही. परंतु ज्याप्रकारे टिकटॉकच्या विरोधात वातावरण तयार होत आहे. ते पाहता बाईटडान्स लवकरच टिकटॉक अॅप विकण्याचा निर्णय घेवू शकते. टिकटॉक अॅपवर बंदी घातल्यामुळे बाईटडान्स कंपनीसोबत चीनला देखील मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत असल्याचं लॅरी कुडलो यांनी सांगितलं.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: TikTok could break away from Chinese parent to avoid ban says Trump adviser

Tags
टॉपिकस
Topic Tags: