नेपाळच्या राजकुमाराने राजा-राणीसह राजघराण्यातील 9 जणांची केली होती हत्या

नेपाळच्या राजघराण्याच्या हत्येचा धक्कादायक इतिहास
nepal royal family massacre
nepal royal family massacresakal

2001 मध्ये या दिवशी नेपाळचे युवराज दीपेंद्र शाह यांनी त्यांच्या राजघराण्यातील नऊ जणांची गोळ्या झाडून हत्या केली होती. दीपेंद्रचे वडील राजा बिरेंद्र, आई राणी ऐश्वर्या आणि राजघराण्यातील इतर 7 सदस्यांचा मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये समावेश होता. कुटुंबीयांची हत्या केल्यानंतर दीपेंद्रने स्वत:वरही गोळी झाडली.

nepal royal family massacre
महाराष्ट्रात दबावाचं राजकारण; राज्यसभेसाठी ED चा वापर होण्याची भीती

1 जूनच्या रात्री राजवाड्यात एका मेजवानीचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये फक्त काही निवडक पाहुणे उपस्थित होते. दरम्यान, मद्यधुंद राजकुमार दीपेंद्र खोलीतून बाहेर आला आणि मेजवानीला आलेल्या पाहुण्याशी भांडू लागला. कुटुंबीयांनी मध्यस्थी करत दीपेंद्रला त्याच्या खोलीत पाठवले. दीपेंद्र शांत होण्यासाठी खोलीत जाईल, असे कुटुंबीयांना वाटले, मात्र दुसऱ्याच क्षणी दीपेंद्र सोबत असलेल्या 3 बंदुकांसह खोलीबाहेर आला.

nepal royal family massacre
"आपलं भविष्य घडवण्यात एसटीचा वाटा"; मुख्यमंत्र्यांनी जागवल्या आठवणी

कोणी समजण्यापूर्वीच दीपेंद्रने बंदुकीतून अंदाधुंद गोळीबार सुरू केला आणि काही मिनिटांतच त्याच्याच कुटुंबातील 9 जणांचा बळी घेतला. संपूर्ण हत्याकांडानंतर दीपेंद्रने स्वत:वरही गोळी झाडली. या निर्घृण हत्येनंतर दीपेंद्र तीन दिवस कोमात राहिला आणि 4 जून रोजी त्याचा मृत्यू झाला.

nepal royal family massacre
KK च्या मृत्यूला ममता बॅनर्जी सरकार जबाबदार; भाजपाचा दावा

आवडीच्या मुलीशी लग्न न केल्याने गोळी झाडली?

प्रिन्स दीपेंद्र यांनी इंग्लंडमधील इटन कॉलेजमध्ये शिक्षण घेतले. यादरम्यान त्यांनी नेपाळी नेते शमशेर जंग बहादूर राणा यांची मुलगी देवयानी यांची भेट घेतली. असे म्हटले जाते की इंग्लंडमध्येच दीपेंद्र आणि देवयानी एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांना लग्न करायचे होते, परंतु राजघराणे या नात्याला विरोध करत होते.

nepal royal family massacre
जागतिक दूध दिन : दूध न आवडणारा मुलगा बनला 'मिल्क मॅन ऑफ इंडिया'

दीपेंद्रचे लग्न शाही कुटुंबात व्हावे अशी राणीची इच्छा होती. जेव्हा दीपेंद्रने तिला देवयानीशी स्वतःच्या मर्जीने लग्न करण्यास सांगितले तेव्हा महाराणी रागावल्या आणि स्पष्टपणे नकार दिला. एकीकडे राजघराण्यातील आणि दीपेंद्र यांच्यात लग्नाच्या मुद्द्यावरून अंतर वाढू लागले, तर दुसरीकडे राजघराण्याशी संबंधित निर्णयांमध्ये दीपेंद्रचा सहभागही कमी होऊ लागला. त्यामुळे दीपेंद्रची नाराजी वाढू लागली, त्याची परिणती खुनात झाली. असा होता हा कौटुंबिक हत्येचा धक्कादायक इतिहास

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com