Worker Strike : कामगार संपामुळे जर्मनीतील वाहतूक ठप्प

वेतनवाढीच्या मागणीसाठी संघटनांचे ‘काम बंद’ आंदोलन
Traffic blocked due to labor strike in Germany Unions strike demand wage hike
Traffic blocked due to labor strike in Germany Unions strike demand wage hikesakal

बर्लिन/फ्रँकफर्ट : जर्मनीतील अनेक कामगार संघटनांनी केलेल्या देशव्यापी संपामुळे सोमवारी सकाळी बहुतांश विमानतळ, बस आणि रेल्वे स्थानकांवरील वाहतूक ठप्प झाली होती. आठड्याच्या पहिल्याच दिवशी संप झाल्याने कामावर जाणाऱ्या हजारो कर्मचारी आणि अन्य प्रवाशांना याचा फटका बसला.

युरोपमधील सर्वांत मोठी अर्थव्यवस्था असलेल्या जर्मनीतील हा दशकातील सर्वांत मोठा संप असल्याचे मानले जात आहे. ‘वर्दी’ ही कामगार संघटना आणि ‘ईव्हीजी’ हा रेल्वे आणि वाहतूक संघटना यांनी हा २४ तासांचा संप पुकारला होता.

१०.५ टक्के वेतनवाढीसाठा कामगार संघटनांनी हा संप केला होता. दोन टप्प्यांत पाच टक्क्यांत वाढ देण्याची मागणा कामगारांनी फेटाळली आहे. जर्मनीतील बंदरे आणि जलवाहतुकी कर्मचारी संपात सहभागी झाल्याने माल वाहतुकीवर परिणाम झाला. सार्वजनिक वाहतूक बंद असल्याने अनेकांनी मोटारीतून कामाच्या ठिकाणी जाण्यास पसंती दिली, पण त्यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती.

म्युनिक आणि फ्रँकफर्ट या देशातील सर्वांत मोठ्या विमानतळांवरील उड्डाणे रद्द केली होती. तसेच जर्मनीतील रेल्वे वाहतूक कंपनी ‘डोयचे बान’नो दीर्घ पल्ल्याच्या रेल्वे रद्द केल्या. सार्वजनिक वाहतूक आणि विमानतळांसह सार्वजनिक क्षेत्रातील सुमारे २५ लाख कर्मचाऱ्यांसाठी वर्दी संघटना आणि ‘डोयचे बान’ आणि बस कंपन्यांमधील दोन लाख ३० हजार कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी वाटाघाटी करीत आहे.

‘वर्दी’चे प्रमुख फ्रँक वेर्नेक म्हणाले, की महागाईच्या काळात लाखो कामगारांपुढे जगण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने याकडे लक्ष वेधण्यासाठा हा संप करण्यात आला, असे वृत्त ‘बिल्ड ॲम सोनटॅग’ या वृत्तपत्राने दिल्याचे ‘रॉयटर’ने म्हटले आहे.

महागाईचा दर ९ टक्क्यांवर

जर्मनीमध्ये महागाईचा दर फेब्रुवारीत गेल्या वर्षीच्या तुलनेत ९.३ टक्क्यांवर गेला आहे. अपेक्षेपेक्षा जास्त दराने महागाई वाढली आहे. व्याजदर वाढीद्वारे त्यावर नियंत्रित आणण्याचा प्रयत्न युरोपियन सेंट्रल बँक करत असतानाही खर्चाचा दबाव कायम आहे.

संबंधित कंपन्या व संस्थाचालकानी कामगारांना अद्याप व्यवहार्य प्रस्ताव दिलेला नाही. दिली नव्हती. यामुळे आगामी इस्टर सुटीच्या कालावधीसह यापुढेही असे संप होऊ शकतील.

मार्टिन बुर्केट, अध्यक्ष, एव्हीजी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com