Travel Without Passport : पासपोर्ट फ्री परदेशवारी शक्य? 'ही' विमान कंपनी करतेय टेक्नोलॉजी टेस्टींग

लवकरच इंटरनॅशनल ऑनबोर्डच्या वेळी पासपोर्ट दाखवण्याची गरज पडणार नाही. या टेक्नॉलॉजीवर ब्रिटीश एयरवेज काम करत आहे.
Travel Without Passport
Travel Without Passportesakal

Travel Without Passport Technology Testing : आता अशा एका तंत्रज्ञानावर काम सुरू आहे, ज्यामुळे तुम्हाला पासपोर्टशिवाय परदेश वारी करता येणार आहे. यावर ब्रिटीश एयरवेज काम करत आहे. त्यामुळे लंडनचे प्रवासी पासपोर्ट फ्री परदेश वारी करू शकतील.

यासाठी British Airways बायोमॅट्रिक टेक्नोलॉजीचं ट्रायल लंडनच्या Heathrow एयरपोर्ट टर्मिनल 5 वर केलं जात आहे. यामुळे लंडनचे प्रवासी आपला चेहरा, पासपोर्ट आणि बोर्डिंग पास स्मार्टफोन आणि टॅबमध्ये स्कॅन करू शकतील.

Travel Without Passport
Religious Traveling : काय सांगताय! एका रात्रीत उभी राहिलीत ही मंदिरे ; पौराणिक कथा वाचून नक्की भेट द्याल

कशी काम करते ही टेक्नोलॉजी

या एयरपोर्ट टर्मिनलवर Smart Bio-Pod कॅमेरा लावण्यात आला आहे. ज्यामुळे इथे येणाऱ्या प्रवाशांना तीन सेकंदाच्या आत व्हेरिफाय केलं जाऊ शकतं. त्यामुळे प्रवाशाला पासपोर्ट दाखवण्याची गरज पडणार नाही. प्रवाशी पासपोर्ट बॅगेतच ठेवून परदेश फिरू शकतात.

Travel Without Passport
Travel Tips : सावधान! हॉटेलच्या खोलीतील बल्ब असू शकतो CCTV

यासाठी लंडनचे लोक आपलं बायोमॅट्रीक डेटा घरून पण रेकॉर्ड करू शकतात. याचा वापर British Airways इंटरनॅशनल फ्लाइट ट्रॅव्हलिंग दरम्यान केला जातो. यामुळे स्मार्ट टेक्नोलॉजीने प्रवाशांना इम्प्रुव्ड एयरपोर्ट एक्सपारियंस मिळू शकतो. त्यामुळे फ्लाइटमध्ये बोर्ड करतानाचा प्रवाशांचा वेळ पण वाचू शकेल. तसंच यामुळे प्रवाशांच्या शंका कमी होतील आणि त्याला योग्य उत्तर देणंही शक्य होईल.

कधीपर्यंत चालेल ही ट्रायल?

British Airways चा बायोमॅट्रीक व्हेरीफिकेशन ट्रायल ६ महिन्यांपर्यंत चालेल. याचा लाभ सध्या लंडन ते स्पेन जाणारे यात्री घेऊ शकतात. कंपनी हा सर्व डेटा सुरक्षित ठेवेन असं सांगते. या नव्या टेक्नोलॉजीचा वापर करणारे प्रवासी कस्टमर फास्ट ट्रॅक सिक्युरिटी लेन आणि प्रायोरिटी बोर्डींगचा आनंद घेऊ शकतात. जर ट्रायल यशस्वी झाली तर कंपनी इतर जागांसाठी ही टेक्नोलॉजी लागू करु शकेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com