
पाकिस्तानचे नाव ऐकताच अनेकांना चीड येते. आतंकवादी कारवाया, घुसखोरी, जगावर दहशत पसरवण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न हे सर्व चित्र समोर येतं. पण, जेव्हा एखादी रिल पाहताना अचानक पाकीस्तानमधील नागरिकांचे जीवन पाहिले की कुठेतरी मनात वाईट वाटतं. कारण, इतरांवर कुरघोड्या करण्याच्या नादात हा देश इथल्या तमाम जनतेलाच विसरला आहे.
पण, आज आम्ही तुम्हाला जे सांगणार आहोत ते वाचून तुम्हालाही धक्का बसेल. याच पाकिस्तानी लोकांनी देशी जुमला शोधला आहे. जो वायू प्रदुषणासारख्या मोठ्या संकटाशी दोन हात करत आहे. पाकिस्तानबद्दलची ही खरं तर सकारात्मक बाजू आहे. त्यामुळे ही फारशी कोणाला माहिती नसेल. (Air Pollution)