अमेरिकेत शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; ट्रम्प सरकारकडून आदेश रद्द

कार्तिक पुजारी
Wednesday, 15 July 2020

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेत आहेत, अशात ट्रम्प सरकारने सर्व परदेशी विद्यार्थ्यांना त्यांच्या देशात परत पाठवण्याचा निर्णय घेतला होता.

वॉशिंग्टन- अमेरिकेच्या ट्रम्प सरकारने परदेशी विद्यार्थांच्या व्हिसाबाबत घेतलेला निर्णय रद्द केला आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेत आहेत, अशात ट्रम्प सरकारने सर्व परदेशी विद्यार्थ्यांना त्यांच्या देशात परत पाठवण्याचा निर्णय घेतला होता. हे  प्रकरण न्यायालयात गेले होते. ट्रम्प यांच्या निर्णयावर अमेरिकी नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे ट्रम्प यांना आपला निर्णय मागे घ्यावा लागला आहे.

चीनसंदर्भातील त्या प्रश्नावर ट्रम्प म्हणाले; नाही म्हणजे नाहीच..
मंगळवारी फेडरल न्यायालयाने ट्रम्प सरकारने आपला निर्णय मागे घेतल्याची माहिती दिली. न्यायाधीश एलिसन बरो यांनी याची सुनावणी केली. सरकाने आपला आदेश लागू न करण्याचा आणि रद्द करण्याला अनुमती दर्शवली आहे, असं त्यांनी सांगितलं.

US Immigration and customs enforcement (ICE) ने 6 जूलै रोजी परदेशी विद्यार्थ्यांना त्यांच्या देशात परत पाठवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर हार्वर्ड आणि एमआयटीसह इतर शैक्षणिक संस्थानी मिळून आयसीई विरोधात तक्रार दाखल केली होती. मैसाच्युसेट्सच्या फेडरल न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या या खटल्याला 17 राज्य आणि डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबियासह गूगल, फेसबुक आणि मायक्रोसॉफ्ट सारख्या मोठ्या अमेरिकी आयटी कंपन्यांनी साथ दिली होती. यात आयसीईने घेतलेल्या निर्णय रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती.

आयसीईने असं म्हटलं होतं की, ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांना अमेरिकेतून जावं लागेल किंवा त्यांना खासजी शिकवणी देणाऱ्या संस्थेत प्रवेश घ्यावा लागेल. आयसीईच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आणि आर्थिक नुकसान होईल, असं तक्रार कर्त्यांनी म्हटलं होतं.

भारतात कुपोषितांची संख्या घटली; किती ते वाचा सविस्तर
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक संस्था ऑनलाईन शिक्षणावर भर देत आहेत. या संस्थानी डोनाल्ड ट्रम्प सरकारवर दबाव वाढवला होता. Institute of International Education (IIE) नुसार 2018-19 शैक्षणिक सत्रात जवळजवळ 10 लाख परदेशी विद्यार्थी अमेरिकेत शिक्षण घेत आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांवर या निर्णायाचा परिणाम पडणार होता. मात्र, नव्या घोषणेमुळे आतंरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. भारतीय विद्यार्थीही मोठ्या प्रमाणात अमिरेकत आहेत. Stundent and Exchange Visiter Programme नुसार जानेवारीमध्ये अमेरिकेच्या अनेक शैक्षणिक संस्थामध्ये 1,94,566 विदार्थ्यांची नोंदणी झाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Trump administration's decision on foreign student visas has changed