

Trump Announces 25 Percent Tariff On Iran Trade Partners
Esakal
अमेरिकेचा इराणसोबत संघर्ष सुरू असून आता इराणशी व्यापार करणाऱ्या देशांवर टॅरिफ लागू करण्याचा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. ट्रम्प यांनी थेट टॅरिफ लागू करण्याची घोषणा केली असून हे फायनल असल्याचंही ठणकावून सांगितलंय. इराणशी व्यापार करणाऱ्या देशांमध्ये भारतसुद्धा आहे. साखर, चहा, औषध, सुका मेवा यांसारख्या अनेक वस्तूंचा व्यापार भारत आणि इराण यांच्यात होतो. सध्या अमेरिकेनं भारताबाबत थेट काही विधान केलेलं नाहीय.