प्रक्षेपण केंद्र पुनर्बांधणीच्या वृत्तावरून ट्रम्प नाराज 

पीटीआय
शुक्रवार, 8 मार्च 2019

वॉशिंग्टन (पीटीआय) : अमेरिका आणि उत्तर कोरिया यांच्यात शांतता प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने अिाण अण्वस्त्र निशस्त्रीकरणाच्या दृष्टीने प्रयत्न केले जात असताना, उत्तर कोरियात एका प्रक्षेपण केंद्राची पुनर्उभारणी केले जात असल्याचे वृत्त पसरले आहे. याबाबत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली. हे वृत्त खरे असेल तर उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग उन यांच्याबद्धल नाराजी राहील, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. अर्थात संबंधित ठिकाणी काम सुरू आहे की नाही, याची खातरजमा करणे कठीण असल्याचेही ट्रम्प यांनी पत्रकारांना सांगितले. 

गेल्या आठवड्यात व्हियतनाम येथे ट्रम्प आणि किम यांनी उत्तर कोरियातील अण्वस्त्र निशस्त्रीकरणासंदर्भात चर्चा करण्यासाठी भेट घेतली होती. मात्र ही द्विपक्षीय चर्चा कोणत्याही निष्कर्षाविना संपली होती. सूत्रानुसार उत्तर कोरियातील सोहाई प्रक्षेपण केंद्राचे काम द्विपक्षीय चर्चेपासूनच सुरू आहे. म्हणजेच व्हिएतनामची बैठक होण्यापूर्वीच त्याचे काम सुरू झाल्याचे सूत्राचे म्हणणे आहे. हे केंद्र ऑगस्ट 2018 पासून निष्क्रिय झाले होते. याचाच अर्थ जाणीवपूर्वक या केंद्राचे काम पुन्हा सुरू केल्याचे दिसते, असे म्हटले आहे. प्यॉंगयांगने याच केंद्रावरून 2012 आणि 2016 रोजी उपग्रह सोडले होते. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Trump annoyed from the report of the Transmission Center rebuilding