
न्यूयॉर्क/वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारत-पाकिस्तानमधील शस्त्रसंधीचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. ‘बंदुकीच्या गोळ्यांऐवजी व्यापाराच्या माध्यमातून भारत आणि पाकिस्तानमधील अणुयुद्ध थांबवू शकलो. या व्यापार कराराचा मला अभिमान आहे,’ असे विधान त्यांनी शुक्रवारी (ता.३०) केले.