Donald Trump : भारत रशियाकडून तेल खरेदी करणार नाही, ट्रम्प यांचा दावा; म्हणाले- पंतप्रधान मोदींनी आश्वासन दिलंय

India Russia Oil Trade : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रशियाकडून तेल खरेदी थांबवण्याचे आश्वासन दिले आहे. ट्रम्प म्हणाले की भारत लगेच हे करू शकत नाही, पण टप्प्याटप्प्याने पावले उचलली जातील.
US President Donald Trump claims Indian PM Narendra Modi assured that India will soon stop importing oil from Russia, signaling a shift in global energy dynamics.

US President Donald Trump claims Indian PM Narendra Modi assured that India will soon stop importing oil from Russia, signaling a shift in global energy dynamics.

esakal

Updated on

Summary

ट्रम्प यांनी पुतिन आणि झेलेन्स्की यांच्यातील द्वेष हा संघर्ष संपवण्यातील मुख्य अडथळा असल्याचे नमूद केले.

अमेरिकेने भारतावर २५% अतिरिक्त कर लादला असला तरी भारत स्वतःचे निर्णय घेणारा सार्वभौम देश असल्याचे अमेरिकन प्रतिनिधीने स्पष्ट केले.

पुतिन यांनी अमेरिकेला इशारा दिला की भारत आणि चीनवर दबाव आणल्यास अमेरिकेलाही आर्थिक तोटा होईल.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी दावा केला की पंतप्रधान मोदींनी त्यांना आश्वासन दिले आहे की भारत रशियाकडून तेल खरेदी थांबवेल. ते म्हणाले की भारत हे लगेच करू शकत नाही, पण लवकरच यासाठी पाऊले उचलेल . ट्रम्प पुढे म्हणाले की ते आता चीनलाही असेच करायला लावतील. रशियाकडून तेल खरेदी थांबवण्यासाठी अमेरिका भारतावर दबाव आणत असताना ट्रम्प यांचे हे विधान आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com