Coronavirus : मी पुराव्यानिशी बोलतोय; ट्रम्प यांचा दावा

Trump confident coronavirus may have originated in Chinese lab
Trump confident coronavirus may have originated in Chinese lab

वॉशिंग्टन : वुहानच्या लॅबमधूनच कोरोना व्हायरसची उत्पत्ती झाली हे मी सहज बोलत नसून पुराव्याच्या बळावर बोलत आहे असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला.

व्हाइट हाऊसमध्ये ते बोलत होते. वुहानच्या लॅबमधून करोना व्हायरसची उत्पत्ती झाल्याचे तुम्ही इतक्या आत्मविश्वासाने बोलत आहात, तुम्ही पुरावे पाहिले आहेत का? पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना ट्रम्प यांनी पुराव्यानिशी बोलत असल्याचा दावा केला. वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी लॅबने त्यांच्यावर होत असलेले आरोप आधीच फेटाळून लावले आहेत. वुहानच्या लॅबमध्ये करोना व्हायरसचे मूळ असून तिथून कोरोनाच्या फैलावाला सुरुवात झाली या आरोपात काहीही तथ्य नाहीय असे लॅबच्या प्रमुखांनी सांगितले आहे.

चीनमधील वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या लॅबमध्ये काम करणाऱ्या इंटर्नकडून अपघाताने करोना व्हायरस लीक झाला असावा, असे वृत्त काही दिवसांपूर्वी एका वृ्त्तवाहिनीने दिले होते. त्यावर वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी लॅबवर आकसातून हे आरोप केले जात आहेत असे वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीचे प्राध्यापक आणि नॅशनल बायोसेफ्टी लॅबोरटरीचे संचालक युआन झिमिंग यांनी म्हटले होते. असा कुठलाही विषाणू बनवण्याचा आमचा हेतू नाही आणि आमच्याकडे तशी क्षमताही नाही असे युआन यांनी सांगितले होते.

जगभरातील निम्म्या कामगारांचा रोजगार जाणार; आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचा इशारा

दरम्यान, वुहानमधल्या बाजारातून कोरोना व्हायरसची सुरुवात झाली. प्राण्यांमधून हा आजार माणसामध्ये आला असे काही तज्ज्ञांचे मत आहे. कोरोना व्हायरसमुळे अमेरिकेत परिस्थिती हातबाहेर गेली आहे. अमेरिकेत १० लाखापेक्षा जास्त लोकांना कोरोना व्हायरसची बाधा झाली असून ६३ हजारपेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे, डोनाल्ड ट्रम्प सातत्याने चीन आणि जागतिक आरोग्य संघटनेवर आरोप करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com