इसिसविरोधात सर्वसमावेश धोरण तयार करण्याचे आदेश

वृत्तसंस्था
सोमवार, 30 जानेवारी 2017

वॉशिंग्टन  : इसिसविरोधात अमेरिकेने निर्णायक कारवाई करणे आवश्‍यक असल्याचे सांगत त्यांना पराभूत करण्यासाठी पुढील तीस दिवसांत "सर्वसमावेशक धोरण' तयार करण्याचे आदेश अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या लष्कराला दिले आहेत.

वॉशिंग्टन  : इसिसविरोधात अमेरिकेने निर्णायक कारवाई करणे आवश्‍यक असल्याचे सांगत त्यांना पराभूत करण्यासाठी पुढील तीस दिवसांत "सर्वसमावेशक धोरण' तयार करण्याचे आदेश अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या लष्कराला दिले आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांनी याबाबत आज विशेष आदेश जारी केला. "मूलतत्त्ववादी इस्लामिक दहशतवाद्यांकडून "इसिस'च्या रूपात अमेरिकेला असलेला केवळ एक धोका नाही, तर ही संघटना अत्यंत आक्रमक आणि धोकादायक आहे. त्यांना स्वतःचा देश निर्माण करायचा आहे. मात्र, असे होऊ दिले जाणार नाही. त्यांना पराभूत करण्यासाठी सर्वसमावेशक धोरण तयार करण्याचे आदेश मी प्रशासनाला देत आहे,' असे ट्रम्प यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे. यासाठी अमेरिकेच्या नियमांमध्ये आणि परकी धोरणामध्ये आवश्‍यक असणारे बदलही सुचवावेत, असे त्यांनी सांगितले आहे. विविध भागांवर नियंत्रण मिळविण्यासाठी इसिस योजनाबद्ध प्रयत्न करत असून, त्यांना यामध्ये यश मिळाल्यास धोका प्रचंड वाढणार असल्याचा इशाराही ट्रम्प यांनी दिला आहे.

रासायनिक शस्त्रे तयार करण्याची क्षमता इसिसने मिळविली असल्याचा ट्रम्प यांचा दावा आहे. या दहशतवादी संघटनेने आखाती देशांमधील अमेरिकी नागरिकांवर हल्ले केले असून, मित्रदेशांनाही त्यांच्यामुळे धोका निर्माण झाला असल्याने त्यांच्याविरोधात तातडीने कारवाई करण्याची आवश्‍यकता असल्याचे ट्रम्प यांनी आदेश देताना म्हटले आहे. इसिसला आणि त्यांच्या विचारसरणीला एकटे पाडण्यासाठी नागरिकांमध्ये जागृती करणे, माहिती मिळविणे आणि सायबर धोरण याबाबत योजना आखण्याचे आदेशात म्हटले आहे. इसिसला मिळणारी आर्थिक मदत बंद करण्याकडेही विशेष लक्ष दिले जाणार आहे.

Web Title: trump directs to make a comprehensive anti-terror policy