"डब्लूटीओ'मधून बाहेर पडणार नाही : ट्रम्प 

वृत्तसंस्था
रविवार, 1 जुलै 2018

 
डब्लूटीओमधून बाहेर पडण्यासंबंधी बोलत नाही. माझे म्हणणे आहे, की त्यांचे आमच्याबरोबरचे वर्तन योग्य राहिलेले नाही. आमच्याबरोबर त्यांचे वागणे योग्य नाही.  - डोनाल्ड ट्रम्प, अमेरिकेचे अध्यक्ष 

वॉशिंग्टन, ता. 30 (पीटीआय) : जागतिक व्यापार संघटनेतून (डब्लूटीओ) बाहेर पडण्यासंबंधी अमेरिका विचार करत असल्याच्या वृत्ताचा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज इन्कार केला. मात्र, संघटनेत अमेरिकेला अतिशय वाईट वागणूक दिली जात असल्याचे सांगायलाही ते विसरले नाहीत. त्याबद्दल त्यांनी संघटनेवर टीकाही केली. 
ट्रम्प यांनी आपल्या अव्वल अधिकाऱ्यांजवळ डब्लूटीओमधून बाहेर पडण्याची इच्छा व्यक्त केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. मात्र, ट्रम्प यांनी सांगितले, की डब्लूटीओ आमच्याशी अतिशय वाईट वागत आहे. ही खूपच अनुचित स्थिती आहे. तुम्ही डब्लूटीओकडे पाहिल्यास असे दिसून येईल, की चीनने ज्या वेळी संघटनेचे सदस्यत्व घेतले, तेव्हापासून चीनलाच यामध्ये फायदा झाला आहे. संघटना अमेरिकेशी भेदभाव करत आहे. 
 
डब्लूटीओमधून बाहेर पडण्यासंबंधी बोलत नाही. माझे म्हणणे आहे, की त्यांचे आमच्याबरोबरचे वर्तन योग्य राहिलेले नाही. आमच्याबरोबर त्यांचे वागणे योग्य नाही. 
- डोनाल्ड ट्रम्प, अमेरिकेचे अध्यक्ष 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Trump does not leave the WTO