चीनकडून कधी अमेरिकेला विचारणा झाली काय: ट्रम्प

वृत्तसंस्था
सोमवार, 5 डिसेंबर 2016

वॉशिंग्टन - अमेरिकेचे होणारे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्‌विटरच्या माध्यमामधून चीनवर जोरदार टीका केली आहे. दोन दिवसांपूर्वी ट्रम्प हे तैवानच्या राष्ट्राध्यक्षांशी दूरध्वनीवर बोलल्यामुळे चीनने संताप व्यक्त केला होता. या पार्श्‍वभूमीवर, ट्रम्प यांनी चीनकडून चलनाचे अवमूल्यन व दक्षिण चिनी समुद्रामध्ये लष्करी विस्तारवाद केला जात असल्याची टीका केली आहे. ट्रम्प यांनी अध्यक्षीय निवडणुकीच्या प्रचारादरम्यान चीनला सातत्याने लक्ष्य केले होते.

""चीनकडून चलनाचे अवमूल्यन केले जात असताना' वा दक्षिण चिनी समुद्राच्या मध्यवर्ती क्षेत्रामध्ये प्रचंड मोठा लष्करी तळ बांधण्यात येत असताना अमेरिकेस विचारणा करण्यात आली होती का? मला वाटत नाही!,'' असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे.

चीन हा अमेरिकेचा सर्वांत मोठा व्यापारी भागीदार देश असला; तरी 2015 मधील आकडेवारीनुसार या द्विपक्षीय व्यापारामध्ये अमेरिकेस तब्बल 366 अब्ज डॉलर्सची तूट सहन करावी लागत आहे. ट्रम्प यांनी प्रचारादरम्यान हा मुद्दा प्रकर्षाने मांडला होता. या पार्श्‍वभूमीवर, त्यांच्याकडून व्यक्त करण्यात आलेली ही भूमिका अत्यंत संवेदनशील मानण्यात येत आहे.

तैवानच्या राष्ट्राध्यक्षांशी ट्रम्प यांनी दूरध्वनीवरुन साधलेला संवाद हे ट्रम्प "अननुभवी' असल्याचे लक्षण असल्याची टीका चीनकडून करण्यात आली होती.

Web Title: Trump fires a salvo at china, again