
वॉशिंग्टनः अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फर्निचर आयातीवर टॅरिफ लावण्याचा प्रस्ताव मांडला आहे. येत्या ५० दिवसांत याची चौकशी पूर्ण होईल आणि त्यानंतर इतर देशांकडून अमेरिकेत येणाऱ्या फर्निचरवर किती शुल्क आकारायचे, हे निश्चित केले जाईल. ट्रम्प यांचे म्हणणे आहे की, या पावलामुळे अमेरिकेतील उद्योगाला पुन्हा बळकटी मिळेल आणि उत्पादनाला देशांतर्गत मागणी वाढेल.