Trump India Tariff News
esakal
अमेरिकेकडून भारतावर पुन्हा अतिरिक्त आयातशुल्क लावण्याची तयारी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, भारतावर २५ टक्क्यांपर्यंत अतिरिक्त शुल्क लावण्याचा प्रस्ताव अमेरिकेकडून मांडला जात आहे. भारतासह आणखी सहा देशांनाही या निर्णयाचा फटका बसण्याची शक्यता आहे. कंबोडिया, इंडोनेशिया, दक्षिण कोरिया, मलेशिया, तैवान आणि थायलंड या देशांचाही त्यात समावेश आहे.
या देशांच्या व्यापार आणि उत्पादनाशी संबंधित धोरणांची अमेरिकेकडून तपासणी सुरू आहे. त्यांच्या बाजारपेठेतील मागणीपेक्षा अधिक वस्तूंचे उत्पादन होत असल्याचा आरोप अमेरिकी अधिकाऱ्यांनी केला आहे. याच कारणावरून नव्या शुल्काचा प्रस्ताव पुढे आल्याचे सांगितले जात आहे.