Trump accuses India :''रशियाकडून तेल खरेदी करून भारत कमावतोय नफा'' ट्रम्प यांचा आरोप; अन् टॅरिफ वाढवण्याचीही धमकी!

Trump India tariff threat: रशियाच्या युद्धयंत्रणेने युक्रेनमध्ये किती लोकांना मारले आहे याची भारताला पर्वा नाही, असंही ट्रम्प यांनी म्हटलंय..
Former US President Donald Trump accuses India of earning profits from Russian oil deals and hints at imposing higher tariffs on Indian exports.
Former US President Donald Trump accuses India of earning profits from Russian oil deals and hints at imposing higher tariffs on Indian exports. esakal
Updated on

Trump Targets India Over Russian Oil Deal : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर आरोप केला आहे आणि म्हणाले आहेत की, भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणात कच्चे तेल खरेदी करत आहे आणि नंतर त्या तेलाचा मोठा भाग आंतरराष्ट्रीय बाजारात चढ्या किमतीत विकून मोठा नफा कमवत आहे. 

एवढच नाहीतर युक्रेनमधील मानवी संकटाबद्दल भारत उदासीन असल्याचा आरोपही ट्रम्प यांनी केला. ट्रम्प म्हणाले की, रशियाच्या युद्धयंत्रणेने युक्रेनमध्ये किती लोकांना मारले आहे याची भारताला पर्वा नाही.

ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथ सोशलवर पोस्ट केले आणि म्हटले की, भारत रशियाकडून केवळ मोठ्या प्रमाणात तेल खरेदी करत नाही, तर आंतरराष्ट्रीय बाजारात खरेदी केलेल्या तेलाचा मोठा भाग विकूनही मोठा नफा कमवत आहे. त्यांना रशियन युद्धयंत्रणेने युक्रेनमध्ये किती लोकांना मारले आहे याची पर्वा नाही. या कारणास्तव, मी भारताकडून अमेरिकेला दिल्या जाणाऱ्या टॅरिफ शुल्कात मोठी वाढ करेन.

Former US President Donald Trump accuses India of earning profits from Russian oil deals and hints at imposing higher tariffs on Indian exports.
Owaisi praises Siraj: ''पूरा खोल दिया पाशा...'' , ओवैसींनी केलं सिराजचं खास हैदराबादी स्टाइलने कौतुक

ट्रम्प यांनी गेल्या आठवड्यात भारतावर २५ टक्के कर लावण्याची घोषणा केली होती, जी १ ऑगस्टपासून लागू होणार होती. पण आता ती एका आठवड्यासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. अमेरिकेने जारी केलेल्या नवीन सूचनांमध्ये, हा कर आता सात दिवसांनंतर बांगलादेश, ब्राझील आणि भारतासह इतर देशांवर लागू केला जाईल, जो ७ ऑगस्ट २०२५ पासून लागू होईल.

Former US President Donald Trump accuses India of earning profits from Russian oil deals and hints at imposing higher tariffs on Indian exports.
Himachal Cow Viral Video: गाय से क्या नाता है, गाय हमारी माता है..! ‘त्या’ दोघांच्या कौतुकास्पद कृतीमुळे पुन्हा एकदा झालं सिद्ध

ट्रम्प यांच्या टॅरिफच्या घोषणेवर, भारताने स्पष्ट शब्दात सांगितले होते की राष्ट्र हितासाठी शक्य ती सर्व पावले उचलली जातील. त्याच वेळी, एका सरकारी अधिकाऱ्याने सांगितले होते की भारत अमेरिकेच्या टॅरिफला वाटाघाटीच्या टेबलावर उत्तर देईल. तर लोकसभेत बोलताना केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी असेही सांगितले होते की चर्चा १० ते १५ टक्के टॅरिफबद्दल झालेली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com