Donald Trump Iran news
esakal
अमेरिका आणि इराणमधील संघर्ष पुन्हा पेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर इराणविरोधात पुन्हा लष्करी कारवाई करण्यासाठी दबाव टाकत असल्याचा दावा अमेरिकेतील प्रसिद्ध पत्रकार टकर कार्लसन यांनी केला आहे. इतकंच नाही, तर या आठवड्यात अमेरिका इराणवर अण्वस्त्र हल्ला करू शकते, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे.