'अमेरिका व जगाच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करू'

वृत्तसंस्था
सोमवार, 13 नोव्हेंबर 2017

मोदी आणि ट्रम्प यांच्या दरम्यान द्विपक्षीय संबंध, संरक्षण आणि जागतिक प्रश्‍नांवर चर्चा झाली. या भेटीनंतर दोन्ही नेत्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. मोदी म्हणाले, की ट्रम्प यांची पुन्हा एकदा भेट घेतल्यानंतर मी आनंदित आहे. भारत आणि अमेरिकेचे संबंध फक्त दोन देशांपुरते मर्यादित नाही. आशियाच्या भविष्यासाठी आणि जगात मानवतावादी दृष्टीकोनातून काम करण्यासाठी दोन्ही देश एकत्र आले आहेत

मनिला : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज असिआन परिषदेच्या निमित्ताने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली आणि दोन्ही देश द्विपक्षीय संबंधाच्या पलिकडे जाऊ शकतात तसेच आशियाच्या भविष्यासाठी एकत्रित काम करू शकतील, असे स्पष्ट केले. अमेरिका आणि जगाच्या भारताकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करु, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

मोदी आणि ट्रम्प यांच्या दरम्यान द्विपक्षीय संबंध, संरक्षण आणि जागतिक प्रश्‍नांवर चर्चा झाली. या भेटीनंतर दोन्ही नेत्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. मोदी म्हणाले, की ट्रम्प यांची पुन्हा एकदा भेट घेतल्यानंतर मी आनंदित आहे. भारत आणि अमेरिकेचे संबंध फक्त दोन देशांपुरते मर्यादित नाही. आशियाच्या भविष्यासाठी आणि जगात मानवतावादी दृष्टीकोनातून काम करण्यासाठी दोन्ही देश एकत्र आले आहेत.

काही दिवसांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी नरेंद्र मोदी यांचे भरभरुन कौतुक केले होते. याचा दाखला देत मोदी म्हणाले, की भारताप्रती ट्रम्प यांनी आशावाद व्यक्त केला. मी त्यांचा आभारी आहे. अमेरिका आणि जगाच्या भारताकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करु.

भारतात बदल घडवण्याचे काम वेगात सुरु असून, पारदर्शक आणि परिणामकारक प्रशासनासाठी आम्ही रात्रंदिवस मेहनत करत असल्याचे सांगत मोदी यांनी भारतात नवीन कंपनी सुरु करण्याची प्रक्रिया सोपी आणि जलद करण्यात आल्याचा दावाही केला.

Web Title: trump modi asean