
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पदाची शपथ घेताच अनेक मोठे निर्णय घेतले. यात अवैधरित्या अमेरिकेत घुसखोरी करणाऱ्या आणि वास्तव्य करणाऱ्या नागरिकांचं प्रमाण कमी करण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत. यात त्यांनी अनेक नवे आदेश लागू केले आहेत. जन्मसिद्ध नागरिकत्वाचा अधिकार रद्द करण्याचा आदेशही दिला आहे. यामुळे अमेरिकेत राहणाऱ्या आणि अमेरिकेला जाण्याची इच्छा असलेल्यांची अडचण झाली आहे. दरम्यान, परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठीही कठोर नियम लागू केले आहेत. न्यू जर्सीच्या के नेवार्क एअरपोर्टरवर नुकत्याच झालेल्या एका घटनेची सध्या चर्चा होतेय.