मला डिस्काउंट नको, ट्रम्प यांनी खरेदी केली टेस्ला कार; गाडीत बसले पण चालवलीच नाही, व्हाइट हाउसच्या कर्मचाऱ्यांना देणार

US President Donald Trump buy Tesla car : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या अधिकृत निवासस्थान आणि कार्यालयाच्या परिसरात या कार उभा करण्यात आल्या होत्या. इलॉन मस्क आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी कारसोबत फोटोसेशनही केलं
US President Donald Trump buy Tesla car
US President Donald Trump buy Tesla carEsakal
Updated on

अमेरिकेच्या व्हाइट हाउसमध्ये टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क हे पाच कार घेऊन दाखल झाले. राष्ट्राध्यक्षांचं अधिकृत निवासस्थान आणि कार्यालयाच्या परिसरात या कार उभा करण्यात आल्या होत्या. इलॉन मस्क आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी कारसोबत फोटोसेशनही केलं आणि गाडीतही बसले. दरम्यान, मस्क यांनी ट्रम्प यांनी तुम्हाला आवडणारी कार निवडा असं सांगितलं. ट्रम्प यांनी यावेळी लाल रंगाची कार निवडली आणि गाडीत बसल्यानंतर ही खूपच सुंदर आहे असंही म्हणाले.

US President Donald Trump buy Tesla car
भारतात स्टारलिंक हाय-स्पीड इंटरनेट आणण्याची तयारी, जिओ-स्पेसएक्स यांच्यात करार
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com