

रिलायन्स जिओने भारतात स्टारलिंक हाय स्पीड सॅटेलाइट इंटरनेटसाठी एलॉन मस्क यांच्या स्पेसएक्ससोबत करार केलाय. या माध्यमातून स्टारलिंक सॅटेलाइट इंटरनेटला भारतात आणण्याची तयारी केली. स्पेसएक्सला केंद्र सरकारने भारतात स्टारलिंकची सेवा देण्यासाठी मंजुरी दिल्यास या कराराची अंमलबजावणी होऊ शकेल. मंगळवारी एअरटेलने स्पेसएक्ससोबत करार केला होता.