
नवी दिल्ली: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची शुक्रवारी मध्यरात्री अलास्कामध्ये बैठक होत आहे. दोघेही संपूर्ण अमेरिका सोडून अलास्कामध्येच का भेटत आहेत, असाही एक प्रश्न उपस्थित झाला. काहीही झालं तरी दोन्ही नेत्यांच्या बैठकीचा मुद्दा हा भारत आणि युक्रेनच असणार आहे, असं दिसून येतंय.