भारतीयांचं अमेरिकेत जाणं महागणार; H1 व्हिसा हवा असेल तर द्यावे लागणार ९० लाख; ट्रम्प यांचा निर्णय

Trump On H1 Visa : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एच१ बी व्हिसाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. व्हिसासाठी लागणारी फी ९० लाखापर्यंत वाढवली आहे. यामुळे अमेरिकेत नोकरीचं स्वप्न पाहणाऱ्यांना आता मोठी रक्कम मोजावी लागेल.
donald Trump
donald Trump esakal
Updated on

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एच१ बी व्हिसाबाबत मोठा निर्णय घेतलाय. यामुळे भारतीयांसह इतर देशातील अनेकांच्या अमेरिकेत नोकरीचं स्वप्न धुसर होण्याची शक्यता आहे. एच१ बी व्हिसासाठी आता १ लाख डॉलर म्हणजेच जवळपास ८० ते ९० लाख रुपये इतकं शुल्क भरावं लागणार आहे. ट्रम्प प्रशासनाचे म्हणणे आहे की, या निर्णयामुळे एच१ बी व्हिसाच्या सरसकट वापरावर मर्यादा येईल. कंपन्या अमेरिकन नागरिकांना प्राधान्य देण्याचा विचार करतील. या व्हिसामुळे तेव्हाच प्रवेश मिळेल जेव्हा निश्चित केलेलं शुल्क जमा केलं जाईल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com