
तुम्ही बायडन यांच्या शपथविधीला 20 जानेवारी रोजी हजर रहाल का? पत्रकारांच्या या प्रश्नावर डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट उत्तर देणं टाळलं.
वॉशिंग्टन : अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा अलिकडेच झालेल्या निवडणुकीत पराभव झाला आहे. मात्र, डोनाल्ड ट्रम्प आपला हा पराभव मान्य करायला तयार नव्हते. निवडणूकीत आपला पराभव होतोय, हे लक्षात आल्याबरोबर त्यांनी कांगावा करत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, आता या दृष्टीने ट्रम्प यांनी एक महत्त्वाचे विधान केले आहे. काल गुरवारी ट्रम्प यांनी म्हटलंय की, जर इलेक्टोरल कॉलेजनी जो बायडन यांना निवडणुकीचा विजेता ठरवलं तर मी व्हाईट हाऊस सोडायला तयार आहे.
हेही वाचा - POK मधील गिलगिट-बाल्टिस्तानात हिंसक आंदोलन; निवडणुकीत घोटाळ्याचा आरोप
इलेक्टोरल कॉलेजनी जो बायडन यांना जर विजेतेपदाचे प्रमाणपत्र दिलं तर आपण व्हाईट हाऊस सोडाल का असा प्रश्न डोनाल्ड ट्रम्प यांना विचारण्यात आला होता. या प्रश्नावर ते म्हणाले की, हो, असं झालं तर निश्चितपणे मी व्हाईट हाऊस सोडेन. पण अद्याप 20 जानेवरीपर्यंत बरंच काही घडणं बाकी आहे. खूप मोठा घोटाळा आढळून आला आहे. आपण कम्प्यूटर साधने वापरतो जी हॅक केली जाऊ शकतात. जर इलेक्टोरल कॉलेजनी बायडन यांना विजयी ठरवलं तर ही खूप मोठी चूक असेल तसेच हे मान्य करणे प्रचंड अवघड असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. या निवडणुकीत घोटाळा झालाय. हा एक उच्च स्तरीय घोटाळा आहे, असा पुनरुच्चार ट्रम्प यांनी पुन्हा एकदा केला.
तुम्ही बायडन यांच्या शपथविधीला 20 जानेवारी रोजी हजर रहाल का? पत्रकारांच्या या प्रश्नावर डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट उत्तर देणं टाळलं. त्यांनी म्हटलं की, मला उत्तर माहितीय पण मी ते आत्ताच देऊ इच्छित नाहीये. ट्रम्प यांनी अमेरिकेतील माध्यमे तसेच मोठ्या टेक कंपन्यांवर पक्षपातीपणाचा आरोप केला आहे. तसेच त्यांनी दावा केला की निवडणुक ही काय स्पर्धा नसते.
हेही वाचा - ॲस्ट्राझेनेका लशीचे प्रश्न अन् उपप्रश्न
मी प्रचंड मतांनी निवडणुका जिंकल्या असत्या आणि मी प्रचंड प्रमाणात विजय मिळविला आहे. हे अद्याप नोंदवले गेलेले नाही परंतु नेमकं काय घडत आहे हे लोकांना समजत आहे आणि काय घडले आहे, हे त्यांना माहिती आहे, असेही ते पुढे म्हणाले.