

Donald Trump Hails Narendra Modi As A Strong Leader Video Creates Buzz
Esakal
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केलाय. दक्षिण कोरियात APEC शिखर परिषदेच्या आधी एका भाषणात ट्रम्प यांनी पंतप्रधान हे सर्वात चांगले दिसणारे व्यक्ती म्हटलंय. त्यांना पाहून तुम्हाला ते बापासारखे वाटतील. ते शांत दिसत असले तरी किलर असल्याचंही ट्रम्प म्हणाले. दरम्यान, ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान युद्ध थांबवल्याचा दावा करताना दोन्ही देशांच्या नेत्यांशी काय चर्चा झाली. कशी झाली हेसुद्धा सांगितलंय.