Trump Tarrif Pause : ट्रम्प टॅरिफला ९० दिवस 'ब्रेक', भारतासह युरोपिय देशांना दिलासा; चीनवर रोष कायम

Donald Trump Announces 90-Day Pause On Tariffs : ट्रम्प यांनी सर्व देशांना सध्या तात्पुरता दिलासा दिला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी बहुचर्चित आयातशुल्क वाढीच्या धोरणावरून माघार घेत त्याला नव्वद दिवसांसाठी स्थगिती दिलीय.
Donald Trump Announces 90-Day Pause On Tariffs
Donald Trump Announces 90-Day Pause On Tariffssakal
Updated on

अमेरिकेचे राष्ट्राध्य़क्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आय़ातशुल्क वाढीची घोषणा केल्यानंतर जगभरात खळबळ उडाली होती. शेअर बाजारांवरही याचा परिणाम दिसून आला. ट्रम्प यांच्या टॅरिफ घोषणेनंतर चीननेसुद्धा जशास तसं प्रत्युत्तर देत टॅरिफची घोषणा केली होती. दरम्यान, भारतासह युरोपातील अनेक देशांनी ट्रम्प यांना दिलासा मिळावा यासाठी विनंती करण्यात आली होती. ट्रम्प यांनी सर्व देशांना सध्या तात्पुरता दिलासा दिला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी बहुचर्चित आयातशुल्क वाढीच्या धोरणावरून माघार घेत त्याला नव्वद दिवसांसाठी स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com