अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आणखी एक टॅरिफ बॉम्ब टाकला आहे. परदेशी औषधं, किचन कॅबिनेट, फर्निचर आणि अवजड ट्रकांवर टॅरिफ लागू करण्याची घोषणा त्यांनी केलीय. १ ऑक्टोबरपासून नव्या टॅरिफ शुल्काची अंमलबजावणी केली जाणार आहे. ट्रम्प यांनी सोशल मीडियावर सांगितलं की, देशांतर्गत उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेतला आहे.