
Donald Trump Warns Musk: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उद्योगपती इलॉन मस्क यांच्यात वाद सुरू आहे. एकेकाळी ट्रम्प यांच्या प्रचारासाठी आघाडीवर असलेले मस्क आता अनेक मुद्द्यांवर उघडपणे विरोध करताना दिसत आहेत. या वादाने आता नवं वळण घेतलं असून ट्रम्प यांनी मस्कना थेट अमेरिकेतून गाशा गुंडाळण्याची वेळ येईल अशा शब्दात निर्वाणीचा इशाराच दिलाय. ट्रम्प यांनी म्हटलं की, मस्कना दुकान बंद करून मूळ देश दक्षिण आफ्रिकेत परत जावं लागू शकतं.