हुशार असाल तरच अमेरिकेत या: ट्रम्प

वृत्तसंस्था
शनिवार, 5 जानेवारी 2019

वॉशिंग्टन: डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी निवडून आल्यापासून नोकरीच्या शोधात अमेरिकेत येऊ पाहणाऱ्यांवर बंधने आली आहेत. व्हिसा धोरणात बदल केल्यामुळे कित्येक लोकांना अमेरिकेत जाण्याच्या संधीपासून वंचित राहावे लागले होते. मात्र, आता ट्रम्प यांनी अमेरिकेत येऊ इच्छित असलेल्या लोकांना अमेरिकेत येणाच्या मार्ग खुला केला आहे. अट एकच, तुम्ही हुशार असले पाहिजेत! 

नवीन वर्षाच्या प्रारंभी आपल्या कॅबिनेटला संबोधित करताना जे लोक अमेरिकी कंपनीच्या उत्कर्षामध्ये हातभार लावतील अशाच हुशार लोकांची अमेरिकेला गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अमेरिकेबाहेर गेलेल्या अनेक कंपन्या सरकारच्या विविध धोरणांमुळे परत अमेरिकेत येत आहेत. त्यामुळे त्यांना कर्मचाऱ्यांची गरज भासणार आहे. मात्र इतर देशांमधून अमेरिकेत येणाऱ्या फक्त कुशल आणि हुशार व्यक्तींनाच प्रवेश असला पाहिजे असे त्यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर व्हिसाच्या 'लॉटरी' पद्धतीवर त्यांनी जोरदार टीकास्त्र सोडले आहे. 

Web Title: Trump wants talented people to come to US