

Donald Trump Strong Message To Iran And Arab Nations
Esakal
अमेरिका आणि इराण यांच्यात गेल्या तीन ते चार महिन्यांपासून युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे जगभरात ऊर्जा संकट निर्माण झालंय. दोन्ही देशातील तणावामुळे होर्मुझची सामुद्रधुनी बंद आहे. परिणामी जगात पेट्रोलियम पदार्थांचा तुटवडा भासतोय तर महागाईचा भडका उडाला आहे. दरम्यान, आता पुन्हा एकदा दोन्ही देशातील शांततेच्या चर्चेला सुरुवात झालीय. पण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शांतता कराराबाबत इराणला धमकी दिलीय. इराणसोबत मोठा आणि प्रभावी करार होईल किंवा काहीच करार होणार नाही. जर करार नाही झाला तर महायुद्ध होईल अशा शब्दात ट्रम्प यांनी इशारा दिल्यानं पुन्हा जगाला धडकी भरलीय.