esakal | तुर्कीकडून जगप्रसिद्ध हागिया सोफियाचे रुपांतर मशिदीमध्ये; ख्रिश्चन जगतात संताप 
sakal

बोलून बातमी शोधा

hagiya sopiya

तुर्कीश अध्यक्ष रेसेप तय्यीप इरदोगोन यांनी शुक्रवारी जगप्रसिद्ध हागिया सोफिया संग्रहालय मुस्लीम नागरिकांच्या पूजेसाठी खुले केले आहे. जागतिक आर्किटेक्चरल चमत्कार असणाऱ्या हागिया सोफिया संग्राहलयाचे रुपांतर आता मशिदमध्ये करण्यात आलं आहे

तुर्कीकडून जगप्रसिद्ध हागिया सोफियाचे रुपांतर मशिदीमध्ये; ख्रिश्चन जगतात संताप 

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

इस्तांबुल- तुर्कीश अध्यक्ष रेसेप तय्यीप इरदोगोन यांनी शुक्रवारी जगप्रसिद्ध हागिया सोफिया संग्रहालय मुस्लीम नागरिकांच्या पूजेसाठी खुले केले आहे. जागतिक आर्किटेक्चरल चमत्कार असणाऱ्या हागिया सोफिया संग्राहलयाचे रुपांतर आता मशिदमध्ये करण्यात आलं आहे. यामुळे खिश्चन जगतात संताप पसरला असून अनेक देशांनी इरदोगोन यांच्यावर टीका केली आहे. विशेष करुन ग्रीससोबत त्यांचा वाद पेटण्याची शक्यता आहे.

ब्रेकिग : अरुणाचल प्रदेशात मोठी चकमक; 6 नक्षलवादी ठार
तुर्की शीर्ष न्यायालयाने सहाव्या शतकातील बायझंटाईन स्मारकाचा संग्रहालय म्हणून असलेला दर्जा रद्द केला. त्यामुळे या संग्रहालयाचे रुपांतर मशिदीमध्ये होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यानंतर राष्ट्राध्यक्ष इरदोगोन यांनी तुर्की नागरिकांना संबोधित करताना याची अधिकारिक घोषणा केली.

हागिया सोफिया संग्रहालयाचा यूनेस्कोच्या जागतिक वारसांच्या यादीत समावेश होतो. जगभरातून पर्यटक या वास्तूला भेट देण्यासाठी येत असतात. याची निर्मिती ख्रिश्चिन बायझंटाईन साम्राज्यात करण्यात आली होती. त्यानंतर ऑटोमनांच्या काँस्ट्यनटीनोपलच्या  विजयानंतर 1453 साली याचे रुपांतर मशिदमध्ये करण्यात आले होते. तुर्कीच्या न्यायालयाने 1934 सालचा कॅबिनेटचा निर्णय रद्द करुन पुन्हा याला मशिदचा दर्जा दिला आहे.

तुर्कीच्या या निर्णयामुळे तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. युरोप, ग्रीस आणि तुर्कीचा मित्र रशिया या निर्णयामुळे नाराज आहे. लाखो ख्रिश्चनांचा आवाज ऐकला गेला नाही, तसेच तुर्कीचा निर्णय जगाला भडकवण्याचा प्रयत्न आहे. इरदोगोन यांच्या निर्णयामुळे देश पुन्हा सहा शतकं मागे गेला आहे, अशी टीका ग्रीसकडून करण्यात आली आहे.

भारतात कोरोनाबाधितांची संख्या 8 लाख पार; पण गेल्या 24 तासांत...यूनेस्कोचे प्रमुख अॅड्रे अझोले यांनीही तुर्कीच्या निर्णयावर चिंता व्यक्त केली असून हे खूप दु:खद असल्याचं म्हटलं आहे. यूएनच्या सांस्कृतीक खात्याशी चर्चा न करताच इरदोगोन यांनी एकतर्फी हा निर्णय घेतला असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, जनमानसातील आपली प्रतिमा भक्कम करण्यासाठी इरदोगोन यांनी हा निर्णय घेतला असल्याचं बोललं जात आहे. तसेच इतिहासाच्या खूणा पुन्हा जागृत करण्याचा त्यांचा हेतू आहे