इस्रायलला धडा शिकवण्याची गरज, टर्कीच्या अध्यक्षांची पुतीन यांना साद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

व्लादिमीर पुतीन

इस्रायलला धडा शिकवण्याची गरज, टर्कीच्या अध्यक्षांची पुतीन यांना साद

जेरुसलेम - सध्या गाझा पट्टीत इस्रायल आणि हमासमध्ये रक्तरंजित संघर्ष सुरु आहे. इस्रायलने केलेल्या स्ट्राइकमध्ये आतापर्यंत ४३ जणांचा मृत्यू झाला आहे. इस्रायलच्या या आक्रमक भूमिकेला टर्कीचे राष्ट्राध्यक्ष रिसीप तयिप एर्दोगन यांनी विरोध केला आहे.

पॅलेस्टाइन बरोबर इस्रायलचं जे वर्तन आहे, त्या विरोधात आंतरराष्ट्रीय समुदायाने इस्रायलला कठोर, जरब बसेल, असा संदेश देण्याची आवश्यकता आहे, असे रिसीप तयिप एर्दोगन यांनी रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना म्हटले आहे. जेरुसलेमवरुन निर्माण झालेल्या तणावातून हा संघर्ष वाढला आहे, त्याबद्दल एर्दोगन आणि पुतिन यांनी फोनवरुन चर्चा केली.

हेही वाचा: एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांना दिलासा

एर्दोगन यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाने इस्रायलला कठोर, जरब बसेल, असा संदेश देण्याची आवश्यकतेवर भर दिला. इस्रायलला स्पष्ट संदेश देण्यासाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने हस्तक्षेप करावा, असं एर्दोगन यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा: "सर्वोच्च न्यायालयाने समांतर केंद्र सरकारही बनवावं"

भारतीय महिलेचा मृत्यू

जेरुसलेम इथल्या अल अक्सा मशिदीत पॅलेस्टाइन (Palestine) आणि इस्रायलच्या (Israel) सुरक्षा दलामधील चकमकीने आता रौद्र रुप धारण केलं आहे. आता या दोन्हींमधील संघर्ष पेटण्याची चिन्हे दिसत आहेत. दोन्हीकडून रॉकेट हल्ला (Rocket Attack) केला जात आहे. यामध्ये आतापर्यंत 32 जणांचा मृत्यू झाला आहे. यात एका भारतीय महिलेचाही (Indian Women) समावेश आहे. सौम्या संतोष असं महिलेचं नाव असून ती गेल्या सहा वर्षापासून महिला इस्रायलमध्ये राहत होती.

Web Title: Turkeys Erdogan Tells Putin That Israel Needs A

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top