esakal | मोठी बातमी ! तुर्कस्थानच्या मदतीने पाकचा काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला करण्याचा डाव
sakal

बोलून बातमी शोधा

Erdogan main.jpg

काश्मीरमधील सर्व दहशतवादी कृत्यांना भारताने आतापर्यंत चोख प्रत्युत्तर दिले आहे. लष्कराच्या ऑपरेशनमध्ये अनेक दहशतवाद्यांचा खात्मा झालेला आहे. त्यामुळे आता ते तुर्कस्थानच्या मदतीने काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला करण्याच्या प्रयत्नात आहेत. 

मोठी बातमी ! तुर्कस्थानच्या मदतीने पाकचा काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला करण्याचा डाव

sakal_logo
By
सकाळ ऑनलाइन टीम

अंकारा- पाकिस्तानचा मित्रराष्ट्र असलेल्या तुर्कीने काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्याचा कट रचला असल्याचे समोर आले आहे. ग्रीसमधील माध्यमांत आलेल्या एका वृत्तामध्ये हा खळबळजनक दावा करण्यात आला आहे. तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेचप तय्यप एर्दोगन हे भाडोत्री सैनिकांना हिंसाचार करण्यासाठी काश्मीरमध्ये पाठवण्याची तयारी करत असल्याचे या वृत्तात म्हटले आहे. त्यांच्या सैन्य सल्लागाराने काश्मीरबाबत अमेरिकेत सक्रिय असलेल्या दहशतवादी संघटनेची यासाठी मदत घेतल्याचे बोलले जात आहे. 

ही आहे तुर्कीची इच्छा
पेंटापोस्टगामाच्या अहवालात म्हटले आहे की, तुर्कीच्या भाडोत्री सैनिकांची संघटना सादात आता काश्मीरमध्ये सक्रिय होण्याची तयारी करत आहे. तुर्कीला स्वतःला मध्य आशियातील ताकदवान असल्याचे दाखवायचे आहे. त्यासाठी ते पाकिस्तानबरोबर एकत्रित येत काश्मीरमध्ये हिंसाचार पसरवण्याचा कट रचत आहे. दरम्यान, काश्मीरमधील सर्व दहशतवादी कृत्यांना भारताने आतापर्यंत चोख प्रत्युत्तर दिले आहे. लष्कराच्या ऑपरेशनमध्ये अनेक दहशतवाद्यांचा खात्मा झालेला आहे. त्यामुळे आता ते तुर्कस्थानच्या मदतीने काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला करण्याच्या प्रयत्नात आहेत. 

हेही वाचा- कृषी कायद्यांमुळे ४० टक्के बेरोजगार होतील;काँग्रेसचे नेते राहुल गांधींचा पंतप्रधानांवर पुन्हा घणाघात

तनरिवर्दीवर आहे जबाबदारी
या अहवालात म्हटले आहे की, तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेचप तय्यप एर्दोगन यांनी मिशन काश्मीरची जबाबदारी सादातकडे सोपली आहे. सादातचे नेतृत्त्व एर्दोगन यांचे सैन्य सल्लागार अदनान तनरिवर्दी करतात. यासाठी त्यांनी काश्मीरमध्ये जन्मलेल्या सय्यद गुलाम नबी फई नावाच्या दहशतवाद्याला नियुक्त केले आहे. फई हा  पाकिस्तानी गुप्तचर एजन्सी आयएसआयच्या पैशांच्या जोरावर भारताविरोधात भाडोत्री सैनिकांची भरती केल्याप्रकरणी अमेरिकेत दोन वर्षांची शिक्षा भोगली आहे. 

केएसीचा संस्थापक आहे फई
फईने काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला करण्यासाठी अमेरिकेत 'अमेरिकन कौन्सिल ऑफ काश्मीर'ची (केएसी) स्थापना केली होती. या संघटनेला पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय आर्थिक रसद पुरवत असत. ही संघटना आता तुर्कीची सादात आणि इस्लामिक दुनिया नावाच्या एका एनजीओच्या मदतीने काश्मीरमध्ये कट रचत आहे. या अहवालात म्हटले आहे की, काश्मीरबाबत सय्यद गुलाम नबी फई खूप सक्रिय आहे. तो अनेकवेळा सादातच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याचे दिसला आहे. 

सादातचं काम काय ?
सादात भाडोत्री दहशतवाद्यांचा समूह आहे. जो तुर्की, सीरिया, लिबियासह अनेक देशांमध्ये जिहादींना प्रशिक्षण देणे आणि शस्त्रास्त्रे उपलब्ध करुन देतो. यामध्ये मोठ्या संख्येने तुर्की लष्करातील निवृत्त सैनिकांचा समावेश आहे. त्याचबरोबर असेही म्हटले जात आहे की, सादात मुस्लिम देशातील हजारो मुलांना एकत्रित करुन एक इस्लामी सैन्यदल उभारण्याचा प्रयत्न करत आहे. 
 

loading image