अफगाणिस्तानमधील हल्ल्यांत १२ जणांचा बळी; हल्ला तालिबानने घडविला

वृत्तसंस्था
Wednesday, 26 August 2020

अमेरिका लष्कर काढून घेण्याच्या मार्गावर असताना आणि तालीबान तसेच सरकार यांच्यात शांतता चर्चा अपेक्षित असतानाच हल्ल्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. याचा फटका सामान्य नागरिकांना बसला आहे.

काबूल - अफगाणिस्तानमध्ये मंगळवारी विविध ठिकाणी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यांत किमान 12 बळी गेले. उत्तरेतील बल्ख प्रांतात कमांडो तळावरील हल्ल्यात दोन कमांडो व एक नागरिक ठार झाला.

या विभागातील लष्कराचे प्रवक्ते हनीफ रेझाई यांनी दिलेल्या माहितीनुसार किमान सहा कमांडो व 35 नागरिक जखमी झाले. स्फोटामुळे आजूबाजूच्या घरांचेही नुकसान झाले. जखमी नागरिकांमध्ये महिला आणि मूलांचे प्रमाण जास्त आहे.

तालीबानचा प्रवक्ता झबीउल्लाह मुजाहीद याने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. त्याने तसे ट्वीट केले. असंख्य जवान मारले गेल्याचा दावा त्याने केला, पण अशा हल्ल्यांबाबत तालीबानतकडून नेहमीच अतिरंजीत दावे केले जातात.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पश्चिमेकडील घोर प्रांतातील शाहराक जिल्ह्यात सरकारी सुरक्षा दलांच्या तपासणी चौकीवरील हल्ल्यात आठ जवान ठार, तर पाच जखमी झाले. त्यानंतर सुमारे पाच तास चकमक झाली. या हल्ल्याची जबाबदारी कुणी स्वीकारली नसली तरी यापूर्वी तालीबानने अशा हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली आहे.

काबूलमध्ये रस्त्याच्या बाजूला ठेवण्यात आलेल्या बाँबचा स्फोट होऊन एक महिला पोलीस अधिकारी ठार झाली. आणखी एक महिला अधिकारी व तिचा वाहनचालक जखमी झाले. दरम्यान, उत्तरेकडील एक महामार्ग खुला करण्यासाठी लष्कराने केलेल्या कारवाईत 91 दहशतवादी मारले गेल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाने दिली आहे. याचा कालावधी मात्र समजू शकला नाही.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

१२८२ नागरिकांचा बळी
अमेरिका लष्कर काढून घेण्याच्या मार्गावर असताना आणि तालीबान तसेच सरकार यांच्यात शांतता चर्चा अपेक्षित असतानाच हल्ल्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. याचा फटका सामान्य नागरिकांना बसला आहे. या वर्षी पहिल्या सहा महिन्यांत एक हजार 282 नागरिकांचा बळी गेल्याची माहिती संयुक्त राष्ट्रांतर्फे (युएन) देण्यात आली आहे. 2001 मध्ये अमेरिकेने राजवट उलथून टाकल्यानंतर तालीबान सर्वाधिक बलाढ्य बनला आहे. जवळपास निम्मा देश त्यांच्या नियंत्रणाखाली असल्याचे किंवा त्यांचा ताबा असल्याचे मानले जाते.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Twelve killed in Afghanistan attacks