Twitter : आधी कामावरुन काढलं, दोन दिवसांत परत बोलावलं; ट्वीटरचा मनमानी कारभार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Elon Musk
Twitter : आधी कामावरुन काढलं, दोन दिवसांत परत बोलावलं; ट्वीटरचा मनमानी कारभार

Twitter : आधी कामावरुन काढलं, दोन दिवसांत परत बोलावलं; ट्वीटरचा मनमानी कारभार

ट्वीटरची मालकी इलॉन मस्कच्या हातात आल्यापासून ट्वीटरमध्ये अनेक मोठे बदल होऊ लागले आहेत. नुकतंच ट्वीटरने जगभरातल्या जवळपास अर्ध्या कर्मचाऱ्यांना काढून टाकलं. आता दोनच दिवसांत त्यांना परत कामावर रुजू व्हायला सांगितलं आहे. ट्वीटरच्या या मनमानी कारभाराची सध्या चर्चा सुरू आहे.

हेही वाचा: Twitter ची सशुल्क Blue Tick सेवा सुरू; अमेरिकेसह 'या' देशांत लागू होणार सुविधा, भारतात कधी?

याविषयी काही माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, ट्वीटरने परतलेल्या काही कर्मचाऱ्यांना चुकून काढण्यात आलं आहे. मस्कच्या नव्या संकल्पना अंमलात आणण्यासाठी त्या कर्मचाऱ्यांचे अनुभव आणि कौशल्य गरजेची आहेत, असं वाटल्याने त्यांना परत बोलावलं असल्याची प्रतिक्रिया काही कर्मचाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर हिंदुस्तान टाईम्सला दिली आहे.

हेही वाचा: Twitter : नोकरकपातीचे मस्क यांच्याकडून समर्थन

ट्वीटरकडे या आठवड्यात आता ३,७०० कर्मचारी शिल्लक राहिले आहेत. कंपनीचा मेल आयडी तसंच काही सुविधा वापरण्यात अडचणी यायला लागल्या त्यावेळी या कर्मचाऱ्यांना कळलं की आपल्याला कामावरुन काढून टाकण्यात आलेलं आहे. पण आता पुन्हा कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्यास सांगितलं जात आहे. दोनच दिवसांत अशा प्रकारचा निर्णय घेतल्याने पुन्हा सोशल मीडियावर ट्वीटर आणि इलॉन मस्कची चर्चा आहे.

टॅग्स :TwitterElon Musk