‘ट्विटर’ने बजावली ट्रम्प यांना नोटीस

पीटीआय
रविवार, 31 मे 2020

हिंसेला प्रोत्साहन देत असल्याच्या आरोपावरून ट्विटरने अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटला वर्किंग नोटीस बजावली आहे. गेल्या चार दिवसात ट्विटरने ट्रम्प यांच्या ट्विटला रेड फ्लॅग करण्याची ही दुसरी वेळ आहे. ट्विटरच्या कारवाईने व्हाइट हाउसमध्ये खळबळ उडाली असून ट्विटरला इशारा दिला आहे. या कारवाईमुळे ट्रम्प यांच्या ट्विटवर कोणीही प्रतिक्रिया देऊ शकत नाही किंवा रिट्विट करु शकत नाही.

वॉंशिंग्टन - हिंसेला प्रोत्साहन देत असल्याच्या आरोपावरून ट्विटरने अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटला वर्किंग नोटीस बजावली आहे. गेल्या चार दिवसात ट्विटरने ट्रम्प यांच्या ट्विटला  रेड फ्लॅग करण्याची ही दुसरी वेळ आहे. ट्विटरच्या कारवाईने व्हाइट हाउसमध्ये खळबळ उडाली असून ट्विटरला इशारा दिला आहे. या कारवाईमुळे ट्रम्प यांच्या ट्विटवर कोणीही प्रतिक्रिया देऊ शकत नाही किंवा रिट्विट करु शकत नाही. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विट मेनियापोलिसच्या हिंसाचारसंदर्भातील होते. काही दिवसापासून मेनियापोलिस येथे दंगल उसळली असून ठिकठिकाणी हिंसाचार माजला आहे. या ठिकाणी एका पोलिसावर जॉर्ज फ्लॉयड नावाच्या कृष्णवर्णिय नागरिकाची हत्या केल्याचा आरोप आहे. एवढेच नाही तर जॉर्जने पोलिसांमुळे मला श्‍वास घेता येत नसल्याचे म्हटले होते. या घटनेनंतर शहरात हिंसाचार उसळला आणि आंदोलनकर्ते रस्त्यावर उतरले. ट्रम्प यांनी अन्य एका ट्विटमध्ये आंदोलनकर्त्यांना दरोडेखोर आणि दंगेखोर असे म्हटले होते.

विमान अर्ध्या वाटेवर गेल्यावर समजले वैमानिक... कोरोना पॉझिटिव्ह

त्यांच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी फेडरल सरकार गोळीबार करण्याचा आदेशही देऊ शकते, असे त्यांनी ट्विटरवर म्हटले हाते. परंतु ट्रम्प यांच्या ट्विटनंतर तीन तासांनी ट्विटरने एक वर्किंग नोटीस बजावली. दुसऱ्या गटाला रोखण्यासाठी कारवाईची धमकी देणे ही बाब हिंसाचाराला प्रोत्साहन देते, असे ट्विटरने म्हटले होते.

या देशात 10 हजार लोकांमागे 8 डॉक्टर; तरीही कोरोनाचा एकही बळी नाही!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Twitter warns to donald Trump