Viral : दोन जणींना एकाच व्यक्तीशी करायचंय लग्न, बोला काय करायचं? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Best Friends Marry One Man
Viral : दोन जणींना एकाच व्यक्तीशी करायचंय लग्न, बोला काय करायचं?

Viral : दोन जणींना एकाच व्यक्तीशी करायचंय लग्न, बोला काय करायचं?

Best Friends Marry One Man: प्रेमात पडलेल्या मुली प्रियकराबद्दल पझेसिव्ह असतात. आपल्या प्रियकराने दुसऱ्या मुलीकडे बघू नये, त्यांच्याशी फ्लर्ट करू नये, अशी त्यांची इच्छा असते. पण मलेशियातल्या या दोन घट्ट मैत्रिणींची मात्र भलतीच अट आहे. मलेशियात राहणाऱ्या या मैत्रिणींना एकाच मुलाबरोबर लग्न करायचं आहे. या दोघींनी फेसबुकवर पोस्ट लिहून त्याविषयी सांगितले आहे. ही पोस्ट व्हायरल झाल्यावर लोकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

हेही वाचा: लग्नानंतर अनेक वर्षांनी नवरा-बायको विभक्त का होतात? जाणून घ्या कारणे

अशी केली पोस्ट

फेसबुकवर सेंससी मलेशिया या पेजवर दोघींनी सांगितले की त्यांना एकाच व्यक्तीबरोबर लग्न करून सवत व्हायचे आहे. जो दोघींशी लग्न करेल अशा मुलाच्या त्या शोधात आहेत. फेसबुकवर पोस्ट शेअर करताना त्यांनी मुलगा कसा हवा तेही सांगितले आहे. त्या दोघी बेस्ट फ्रेंड्स असून लग्नानंतर वेगळं होण्यापेक्षा सवत होणं त्यांना पसंत आहे. म्हणूनच त्यांना एकाच माणसाबरोबर लग्न करण्यात गैर वाटत नाहीये. त्यांनी आपल्याविषयी माहिती शेअर केली आहे. त्यात एकीचे वय २७ तर दुसरीचे वय ३१ वर्ष असल्याचे म्हटले आहे. ३१ वर्षांच्या मुलीला एक अपत्य आहे. तर २७ वर्षांच्या मुलीचा स्वत:चा लॉन्ड्री बिझनसे आहे. आपण जश्या आहोत, तसेच त्यांनी स्विकारावे अशी त्यांची अट आहे. तसेच जो दोघींचा स्विकार करेल त्याच्याशी लग्न करायला त्या तयार आहेत.

हेही वाचा: रात्रीच्या 5 सवयी बदला, मस्त, फीट राहाल

फेसबुकवर त्या नशीब आजमावत असल्याचे पोस्टमध्ये लिहिले आहे. त्यांचे नशीब चांगले असेल, तर असा माणूस त्यांना इथे नक्की सापडेल, असे त्यांनी म्हटले आहे. ही पोस्ट फेसबुकवर शेअर होताच तिथून व्हायरल झाली. पोस्टवर लोक भरभरून कमेंट करत आहेत. अनेकजण आपल्या मित्रांना टॅग करून मजाही घेत आहेत.

Web Title: Two Female Friends Want To Marry The Same Man Looking For A Boy By Posting On Social Media

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..