
रात्रीच्या 5 सवयी बदला, मस्त, फीट राहाल
दिवसभर काम केल्यानंतर दुसरा दिवस चांगला जावा यासाठी रात्री सुखाची झोप आवश्यक असते. त्यासाठी रात्री चांगली झोप (sleep) मिळणे आरोग्याच्या (Health) दृष्टीने अत्यंत गरजेचे असते. रोज ६ ते ८ तास झोपल्याचे फायदे आरोग्यतज्ज्ञ नेहमीच सांगतात. पण नीट झोप लागत नसल्यास किंवा झोपेदरम्यान अडचणी येत असल्यास त्याचा हार्मोन्स, व्यायामाची कार्यक्षमता आणि मेंदूच्या कार्यावर विपरीत परिणाम होतो,. तुमचे वजनही (Weight Gain) वाढू शकते. पण रोजच्या धावपळशीच्या आयुष्यात लोकांमधील झोपेची गुणवत्ता आणि प्रमाण कमी झाले आहे. (Night Time Habits Side Effects)
रात्रीच्या नित्यक्रमाचा (Nite Lifstyle) तुमच्या एकूण आरोग्यावर मोठा परिणाम करते. काम करून संध्याकाळी घरी गेल्यावर तुम्ही कोणत्या प्रकारच्या एक्टीव्हिटी करता त्यावर तुमची रात्रीची झोप अवलंबून असते. खराब झोपेमुळे तुमची तब्येतही बिघडत असेल, अशाळी तुम्ही जर या पाच गोष्टी झोपण्याआधी करत असाल तर त्या सवयी तुम्हाला ताबडतोब बदलल्या पाहिजेत.(Night Time Habits Side Effects)

coffee
कॉफी पिणे (Drinking Coffee)
अनेक लोकांना झोपण्याआधी कॉफी पिण्याची सवय असते. कॉफीचा मेंदूवर उत्तेजक प्रभाव पडतो, त्यामुळे तुमचा मेंदू झोपेच्या वेळी सतर्क होतो आणि झोप जवळजवळ नाहीशी होते. यामुळेच झोपायच्या आधी कॅफिन किंवा अल्कोहोलचे सेवन टाळावे असे म्हटले जाते. (Night Time Habits Side Effects)

Sleeping issue
झोपायची वेळ ठरलेली नसणे (No Fix Timing in Sleeping)
दररोज तुमची झोपायची वेळ बदलत असते का? असे असेल तर या सवयीमुळे शरीराला नुकसान पोहचू शकते. रात्री शरीराला आराम देण्यासाठी झोपेची वेळ ठरलेली असणे गरजेचे आहे. तसेच रूटीन सेट करून टाका. (Night Time Habits Side Effects)

Try chili eggs, omelette snacks
काहीतरी खाणे ( Eating Snacks)
रात्री झोपण्याआधी भूक लागणे योग्य नाही. जेव्हा तुम्ही रात्री बराच वेळ काम करत असाल, टिव्ही किंवा मोबाईल बघत असाल तर असे होऊ शकते. जर तुमची ही भुकेची सवय नाश्त्यात बदलली असेल तर ही सवय वाईट आहे. कारण झोपण्यापूर्वी काहीही खाल्ल्यामुळे पोट दुखणे, गॅस आणि अपचन होऊ शकते. त्यामुळे नंतरच्या झोपेवर परिणाम होतो.(Night Time Habits Side Effects)

tv chanal
उशीरापर्यंत जागणे ( Late Nites)
रात्री उशिरापर्यंत जागं राहण्याच्या सवयीचा तुमच्या फिटनेसवर वाईट परिणाम होतो. होय, कोविड काळात नेटफ्लिक्स आणि हॉटस्टारवर ऑनलाइन शोची मागणी वाढली आहे. मनोरंजनासाठी लोकं अनेकदा रात्री उशिरापर्यंत बसून या शोचा आनंद घेतात. या सवयीमुळे लोकांचा रात्रीचा दिनक्रम पूर्णपणे बिघडला आहे. टिव्हीच्या निळ्या प्रकाशाच्या प्रदर्शनामुळे झोपेचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत टीव्ही पाहण्याची सवय सोडणे अत्यंत आवश्यक आहे. (Night Time Habits Side Effects)

tooth brush
ब्रश न करणे (No Brushing At Nite)
सर्वात जास्त स्वच्छतेची गरज दातांनाअसते. त्यामुळे दिवसातून दोनदा दात घासणे गरजेचे आहे. रात्री दात घासणे अत्यंत महत्वाचे मानले जाते. निरोगी, चमकदार आणि दात मजबूत हवे असतील तर रात्री दात घासणे गरजेचे आहे. झोपण्यापूर्वी ब्रश केल्याने तुम्हाला चांगली झोप मिळेल. (Night Time Habits Side Effects)
या रात्रीच्या सवयी जर तुमच्या रुटीनचा भाग असतील तर आजपासूनच त्या बदलणे चांगले. याचा तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम तर होतोच, शिवाय तुम्हाला अनेक आजारांनाही बळी पडावे लागेल. (Night Time Habits Side Effects)